मुळा धरणात 60 टक्के पाणीसाठा

0
कोतूळ – मुळा पाणलोटात पाऊस सुरूच असल्याने मुळा धरणातील पाणीसाठा काल सायंकाळी 58.65 टक्के होता. अजूनही आवक सुरू असल्याने या धरणातील पाणीसाठा 60 टक्के होणार आहे. हरिश्‍चंद्र गड, पाचनई, आंबित व अन्य भागात पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सकाळी मुळा नदीचा कोतूळ येथील विसर्ग 10342 क्युसेक होता. तो सायंकाळी 14806 क्युसेक झाला होता. त्यामुळे लाभक्षेत्रात समाधानाचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

*