मुळा धरण 76 टक्के भरले

0

कोतुळ (वार्ताहर) – दक्षिण नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा धरणाचा साठा 76 टक्क्यांवर गेला आहे. मुळा नदी पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने मुळा धरणात चांगलीच आवक झाली आहे.
काल शनिवारी सायंकाळी सहा वाजता धरणात 18139 दलघफू साठा झाला होता रात्री त्यात आणखी वाढ होऊन साठा 70 टक्के झाला आहे.

तालुक्यातील घाटमाथ्यावर पाऊस सुरूच आहे. मात्र पूर्व भागात काल पावसाचा जोर ओसरला. श्रावण सरींचा वर्षाव अधूनमधून सुरू होता. धरणात सकाळी 7310 क्युसेक तर सायंकाळी 6 वाजता 8028 क्युसेक पाण्याची आवक आवक सुरू होती.
कोतूळ, बोरी, भोळेवाडी या तीन गावांची तहान भागविणारा तलाव ओसंडू वाहत आहे. तसेच कोतूळ शिवारातील वांदरनळी पाझर तलाव भरून वाहत आहे.

LEAVE A REPLY

*