Saturday, April 27, 2024
Homeनगरराहुरी : बंधारे भरण्यासाठी मुळाचे आवर्तन

राहुरी : बंधारे भरण्यासाठी मुळाचे आवर्तन

राहुरी (प्रतिनिधी ) – मुळा धरणातून मुळानदीपात्रात आज (27मार्च) सकाळी राहुरी तालुक्यातील नदीवरील बंधारे भरण्यासाठी अधिकार्‍यांच्या उपस्थितीत पाणी सोडण्यात आले . सुरुवातीला २ हजार क्यूसेक ने सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग नंतर वाढणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली .
राज्य मंत्री नामदार प्राजक्त तनपुरे, नामदार शंकरराव गडाख यांनी मुळा नदीवरील डीग्रस , मानोरी , मांजरी , वांजुळपोई येथील बंधारे भरून घेणार घेण्याच्या सूचना जलसंपदा विभागाला दिल्या होत्या . ही सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी ५६० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे .
१९० ते २४५ दशलक्ष घनफुट क्षमता असणारे हे बंधारे असून नदीकाठी असणाऱ्या २५-३० गावांना याचा लाभ होतो .

- Advertisment -

ताज्या बातम्या