Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

भंडारदरा, निळवंडे पाठोपाठ मुळातूनही पाणी सोडले

Share

कोतूळ, राहुरी (प्रतिनिधी)-  मुळा पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाचा जोर मंगळवारपासून ओसरला असला तरी श्रावण सरींचा लपंडाव सुरू असल्याने मुळा नदीची आवक टिकून आहे. परिणामी धरणात 23 हजार 451 दलघफू पाणीसाठा कायम ठेवण्यात येऊन सायंकाळी 5 वाजता 3 हजार क्युसेकने पाणी नदी पात्रात सोडण्यात आले आहे. भंडारदरा, निळवंडे पाठोपाठ मुळा धरणातूनही पाणी जायकवाडीकडे झेपावले आहे

मुळा धरणाकडे सकाळी 10 हजार 342क्युसेकने आवक सुरू होती. दुपारी 12 हजार 871क्युसेकनेे तर सायंकाळी 11 हजार 142 क्युसेकने मुळा धरणाकडे आवक सुरू होती.  26 टीएमसी क्षमतेचे नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे असणार्‍या मुळा धरणातील पाणीसाठा आठ-दहा दिवसांत झपाट्याने वाढला असून यावर्षी 19 टीएमसीपेक्षा अधिक नवीन पाणी जमा झाले. धरणाचा पाणीसाठा 23 हजार 451 दलघफू झाला असून धरण 90 टक्के भरले आहे. धरण पूर्ण भरण्याची श्यक्यता गृहीत धरून व धरण परिचालनानुसार जास्तीतजास्त 23 हजार 451 दलघफू पाणीसाठा ठेवून उर्वरीत पुराचे पाणी मुळा धरणातून 3 हजार क्युसेकने नदी पात्रात राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते धरणाच्या दरवाज्यांचे चाक फिरवून सोडण्यात आले. धरणातून नदीपात्रात पाणी सुरू झाल्याचे मनमोहक दृष्य पाहण्यासाठी तालुक्यातील नागरिकांनी व पर्यटकांनी धरणावर मोठी गर्दी केली होती.

मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर. पी. मोरे, शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे आदी यावेळी उपस्थित होते. दरम्यान, तहसीलदार फसियोद्दीन शेख, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांसह पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर. पी. मोरे यांनी पाण्याबाबत दक्षता घेत पाणी सोडण्यापूर्वी मुळा नदी काठी असणार्‍या गावांसह नगरपरिषद हद्दीत दवंडी देत लोकांना जागृत राहण्याच्या सूचना केल्या आहेत. पाणी सोडण्यापूवी सायरन वाजविण्यात आले.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!