Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

नगरमधील मायलेकराचा मुळा धरणामध्ये बुडून मृत्यू

Share

 

अहमदनगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील मुळा धरणात मायलेकरांचा बुडून मृत्यू झाला. पूजा गणेश सातपुते (वय 36) आणि त्यांचा मुलगा ओंकार (वय 13) असे बुडून मृत्यू झालेल्या माय लेकराची नावे आहेत. बालिकाश्रम रोडवरील सिंधू मंगल कार्यालयासमोरील आराधना कॉलनीमधील ते रहिवाशी आहे.

सातपुते कुटुंब हे त्यांच्या आणखीन दोन मित्र कुटुंबाबरोबर मुळा धरण परिसरात रविवारची सुट्टी असल्याने फिरायला गेले होते. मुळा धरणात कमी असलेल्या पाण्यामध्ये ओंकार हा खेळत होता. ओंकारला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडूू लागला. हे पाहून ओंकारचे वडील गणेश त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उतरले. परंतु गणेश यांना पोहता येत नव्हते. त्यामुळे तेही पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले.

पती गणेश हे पाण्यात बुडत असल्याचे पाहून त्यांची पत्नी पूजा पाण्यात उतरली आणि त्यांनी गणेश यांना पाण्यातून बाहेर काढले. ओंकार हा पाण्यामध्ये बुडत होता, त्यााला वाचवण्यासाठी पूजा या पुढेेे पाण्यात उतरल्या. परंतु पूजा यांनाही खोल पाण्याचा अंदाज आला नाही. ओंकार आणि पूूूूजा या दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. गणेश आणि त्यांच्याबरोबर असलेल्या मित्र कुटुंबांना या घटनेमुळे मोठा आघात पोहोचला. ओंकार हा सावेडीतील समर्थ शाळेत इयत्ता आठवीमध्ये शिकत होता. पूजा आणि त्यांचा मुलगा ओंकार या दोघांची उत्तरीय तपासणी जिल्हा रुग्णालयाच्या राहुरी उपग्रामीण रुग्णालय झाली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!