मुळा, भंडारदरात यंदा साडेबारा टीएमसी अधिक पाणी

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – यंदा वरूणराजा मेहरबान झाल्याने नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा, मुळा आणि निळवंडे धरणात गत वर्षीच्या तुलनेत तब्बल साडेबारा टीएमसी पाणी अधिक आहे. शिवाय ओव्हरफ्लो सुरू आहे तो वेगळाच.

भंडारदरा आणि मुळा पाणलोटात आषाढसरींनी तांडव केल्याने या धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. भंडारदरा आणि निळवंडे ही दोन्ही धरणे जुलै महिन्यातच ओव्हरफ्लो झाल्याचे भाग्य पाहण्यास मिळाले. परिणामी प्रवरा नदी सध्या दुथडी असून पाणी जायकवाडीत विसावू लागले आहे.
11039 क्षमतेच्या भंडारदरा धरणात गतवर्षी याच कालअखेर 7025 दलघफू पाणी होते. आज हे धरण ओव्हरफ्लो असून धरणात 10705 दलघफू पाण्याची पातळी कायम ठेवली आहे.

8332 दलघफू क्षमतेच्या निळवंडेत गवर्षी केवळ 2911 दलघफू पाणी होते. आता याच धरणात 7909 दलघफू पाणीपातळी कायम ठेवून पाणी प्रवरा नदीत सोडण्यात येत आहे. 26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणात गतवर्षी 14858 दलघफू पाणी होते. ते यंदा 18753 दलघफू पाणी आहे. आढळातही मागीलवर्षीऊ केवळ 491 दलघफू पाणी होते. त्यात यंदा हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यात 1060 दलघफू पाणीसाठा आहे.

7639 दलघफू क्षमतेच्या घोड धरणातही मागीलवर्षी केवळ 4103 दलघफू पाणीसाठा होता. आज या धरणात 7047 दलघफू पाणी आहे. हे धरण नगर जिल्ह्यात नसलेतरी याचा नगर जिल्ह्यातील काही भागाला फायदा होतो. कुकडी समूह प्रकल्पात पाच धरणे असून ही पुणे जिल्ह्यात आहेत. या धरणांमध्येही 13000 दलघफू पेक्षा अधिक पाणी आहे.

अकोल्यात तीन टीएमसीवर पाणी –  अकोले तालुक्यातील आढळा ( 1060),पिंपळगाव खांड (500),बोरी (47.80), बेलापूर-बदगी (94.58), पाडोशी (146), सांगवी (71.23),घोटी-शिळवंडी (160.07),आंबीत (193.19), कोथळे (182), देवहंडी-शिरपूंजे( 185), बलठण (205), टिटवी (203.31) व वाकी (112.66) असे सर्व लघु व मध्यम प्रकल्प यापूर्वीच ओव्हरफ्लो झाले आहेत.

 

LEAVE A REPLY

*