Friday, April 26, 2024
Homeजळगाववढवे येथे डायरीयाची लागण : 40 जण अत्यवस्थ

वढवे येथे डायरीयाची लागण : 40 जण अत्यवस्थ

मुक्ताईनगर  –

तालुक्यातील वढवे गावात डायरियाची लागण झाली असून 40 जण अत्यवस्थ झाले आहेत . दरम्यान आरोग्य पथक वढवे गावात दाखल झाले असून याठिकाणी खा. रक्षाताई खडसे यांच्यासोबत आ.चंद्रकांत पाटील आणि जिल्हा परिषदचे समाज कल्याण सभापती जयपाल बोदडे यांनी वडवे गावात तसेच मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयातील दाखल असलेल्या रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली . तसेच आरोग्य अधिकार्यांना योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले.

- Advertisement -

वढवे येथील ग्रामपंचायत कार्यालयात रुग्णांवर उपचार

दरम्यान रुग्णांची संख्या वाढतच असल्याने वडवे या गावातच ग्रामपंचायत कार्यालयात जमिनीवर चटई अंथरून रुग्णांना सलाईन लावण्यात येत आहेत .वडवे गावातील पाणीपुरवठा होत असलेल्या स्रोताच्या ठिकाणी शौचास बसत असल्याने पाणीपुरवठा करणार्‍या पाईप आतूनच ही घाण थेट नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचून तेच पाणी पिण्यात आल्याने तसेच चांगदेव कडून वडवे गावात पाणीपुरवठा करणार्‍या पाईप लाईन मध्ये दोन ठिकाणी लिकेज झाल्यामुळे दूषित पाणीपुरवठा झाला यामुळे गावात डायरियाची लागण झाली आहे.

त्यात वंदना लक्ष्मण पाटील वय 47 वर्षे तनवी रमेश चौधरी वय पंधरा वर्षे मोहिनी संजय पाटील वय तेरा वर्षे नामदेव संपत पाटील वय 62 वर्षे कविता विनोद पाटील वय 35 वर्षे सुपडाबाई काशिनाथ पाटील वय 61 वर्षे योगेश उमेश सोनवणे वय 30 वर्षे मिराबाई न्यानेश्वर पाटील वय 35 वर्षे अशा आठ जणांवर वडगाव येथे तर शोभा कोळी भूमिका चौधरी मालतीबाई पाटील सुनंदा पाटील माधुरी कोळी मयुरी कोळी संगीता चौधरी रेणुका पाटील शरद चौधरी नयना कन्हेरे संगीता पाटील माया कोळी वंदना पाटील जाईबाई पाटील गजेंद्र पाटील भगवान कोळी सरला पाटील अनिता पाटील गोपाळ चौधरी मधुकर पाटील गयाबाई कोळी उषा जाधव सविता चौधरी उषा पाटील नंदा पाटील अजय पाटील असे एकूण 38 ते 40 जण डायरियामुळे बाधित झाले आहेत हे सर्व उपचार घेत आहेत .

दरम्यान सदर लिकेज शोधून ते जोडण्यात आलेले आहे तसेच मूळ स्रोताच्या ठिकाणावर शौचास कोणी बसणार नाही याची दक्षता घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले त्यासोबतच पाणी गाळून व उकळून प्या आणि काही त्रास झाल्यास लवकरात लवकर आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असे आवाहनही तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश पाटील तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश राणे यांनी आवाहन केले आहे.दरम्यान माहिती मिळता बरोबर रावेर मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे , मुक्ताईनगर विधानसभेचे आ. चंद्रकांत पाटील तसेच जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती जयपाल बोदडे यांनी वढवे येथे तसेच मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात जाऊन रुग्णांची पाहणी केली व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश पाटील तसेच डॉक्टर योगेश राणे यांना योग्य उपाययोजना करण्याचे आदेश दिले दरम्यान उद्या दिनांक 20 रोजी जळगाव येथील आरोग्य पथक वढवे गावात तसेच उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर येथे दाखल होणार असल्याची माहितीही देण्यात आली.उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर तसेच वढवे ग्रामपंचायत कार्यालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य कर्मचार्‍यांचे पथक तळ ठोकून

वढवे येथील रुग्णांना डायरिया ची लागण झाल्याने मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून तेथे डॉक्टर योगेश राणे डॉक्टर शेख तसेच डॉक्टर श्रीमती अच्छा मॅडम तसेच आरोग्य कर्मचारी उपचार करीत आहेत तर ते गावात डॉक्टर निलेश पाटील डॉक्टर प्रवीण देशमुख डॉक्टर किरण सुपे डॉक्टर खडसे डॉक्टर विशाल चौधरी त्यासोबतच आरोग्यसेविका मेश्राम रीना सोनवणेे ए जी पाटील तसेच आरोग्य सेवक आर आर ठोंबरे ए जी गंगतीरे विजय पाटील पप्पा एम के तारू आर आर सुरवाडे असे आरोग्य पथक तळ ठोकून आहे. यासोबतच ग्रामसेवक मेढे हे सुद्धा गावात तळ ठोकून आहे. याठिकाणी चांगदेव येथील समाजसेवक अतुल पाटील यांचे सुद्धा सहकार्य लाभत आहे.

आठवड्याभरातच दुसर्‍यांदा डायरीयाची लागण -दरम्यान मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथे सुद्धा या आठवड्याभरातच डायरी याची लागण झाली होती. चांगदेव आणि वढवे यामध्ये केवळ दोन-तीन किलोमीटरचे अंतर आहे .त्यानंतर आज वढवे गावात दूषित पाण्यामुळे डायरीयाची लागण झाली. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या कामकाजाबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या