Type to search

Breaking News जळगाव राजकीय

अखेर ॲड.रोहिणी खडसे खेवलकर यांना उमेदवारी : चर्चांना मिळणार विराम

Share

जळगाव (प्रतिनिधी) –

राज्यासह केंद्राचे लक्ष मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाकडे लागलेले होते. भाजपच्या तीनही याद्यांमध्ये माजीमंत्री आ.एखनाथराव खडसे यांचे नाव न आल्याने भाजप समर्थकांमध्ये कमालीची अस्वस्थता होती.

काल खडसे यांच्याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात होते. सोशलमिडीयावर तर चर्चांना उत आला होता. परंतु आज सकाळी भाजपने चौथी यादी जाहीर केली असून त्यात त्यांची कन्या ॲड.रोहिणीताई खडसे खेवलकर यांना उमेदवारी देण्यात आल्याचे वृत्त आहे.

आ.खडसे यांना तिकीट मिळावे यासाठी कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत आत्मदहनाचाही प्रयत्न केला. मात्र पक्षनिष्ट खडसे यांनी सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना शांत करत पक्षश्रेष्टींचा आदेश सर्वमान्य राहील असे सांगत वातावरण शांत केले.

आता मात्र जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने सर्व चर्चांना विराम मिळेल यात शंका नाही.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!