Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला पाठींबा; सेनेचे संख्याबळ वाढले

Share

नाशिक | प्रतिनिधी 

राज्यात विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पार पडल्या. सेना भाजपचे मुख्यमंत्री पदावरून सध्या रणकंदन माजले आहे, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शिवसेनेच्या पाठींब्यावरच राज्याच्या सत्तेची गणितं जुळणार आहेत. त्यामुळे अपक्ष विजयी उमेदवारांना आपल्या बाजूने करून ताकत वाढविण्यासाठी सध्या भाजप सेना प्रयत्न करत आहेत.

मुक्ताईनगरमध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवार व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचा पराभव करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी आज मातोश्री गाठून शिवसेनेला जाहीर पाठींबा देऊ केला आहे. यामुळे भाजपसोबतच शिवसेनेचे पक्षीय बलाबल वाढले आहे.

मुक्ताईनगरमधून भाजपने एकनाथ खडसे यांचे तिकीट कापल्यानंतर त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली. ही जागा भाजपसाठी सोडण्यात आल्यामुळे शिवसेनेचे चंद्रकांत पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता.

पाटील यांनी या निवडणुकीत विजय संपादन केला तर रोहिणी खडसे यांचा निसटता पराभव झाला.  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुक्ताईनगरमध्ये सभा घेत अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला होता. तर खडसे यांनी मतदार संघात खडसे विरोधी सर्व पक्ष असा प्रचार झाल्याची खदखद व्यक्त केली होती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!