Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशरिलायन्सने सरकारी तिजोरीत केला 31 हजार कोटींचा आगाऊ भरणा अन् वाचवले 1200...

रिलायन्सने सरकारी तिजोरीत केला 31 हजार कोटींचा आगाऊ भरणा अन् वाचवले 1200 कोटी

रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडने (Reliance Jio Infocom Limited) मोठा निर्णय घेतला. या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीत 31 हजार कोटींची भरणा झाली असून मुकेश अंबानी (mukesh ambani) यांच्या रिलायन्सनेही (Reliance JIO) वर्षाला 12 हजार कोटींची बचत केली आहे. या निर्णयामुळे औद्योगिक विश्वातही कंपनीची खासा प्रतिमा तयार केली आहे.

आबांच्या मुलाने करुन दाखवले : म्हणाला होता, निकालावेळी माझ्या बापाची आठवण येईल

- Advertisement -

जिओने 2014, 2015, 2016 मध्ये स्पेक्ट्रम विकत घेतला तसेच जिओने 2021 मध्ये भारती एअरटेल लिमिटेडकडून (Bharti Airtel) स्पेक्ट्रम विकत घेतले. कंपनीने ही सर्व देणी भरली आहेत. जिओने दूरसंचार विभागाला 30,791 कोटी रुपये दिले आहेत.

जिओने लिलावात मिळालेल्या स्पेक्ट्रमच्या संपूर्ण दायित्वांची वेळेआधीच परतफेड केली आहे. कंपनीने या लिलाव आणि सौद्यांमध्ये 585.3 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम विकत घेतले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे सोशल मीडियात चर्चेत आलेले टेलिप्रॉम्प्टर आहे काय?

रिलायन्सची 1200 कोटींची बचत

दूरसंचार विभागाने दूरसंचार कंपन्यांसाठी डिसेंबर 2021 मध्ये पॅकेज जाहीर केले होते. ज्यात देयकाच्या अटी लवचिक होत्या. परंतु जिओने 2016 मध्ये मिळालेल्या स्पेक्ट्रम पेमेंटचा पहिला हप्ता ऑक्टोबर 2021 मध्येच भरला. जिओने जानेवारी 2022 मध्ये लिलावात प्राप्त झालेल्या स्पेक्ट्रमच्या संपूर्ण स्थगित दायित्वांना तसेच ट्रेडिंगद्वारे प्राप्त स्पेक्ट्रम देणी ही वेळेत जमा केली. वास्तविक आर्थिक वर्ष 2022-23 ते 2034-2035 या वार्षिक हप्त्यांमध्ये ही रक्कम देय होती आणि यावर वार्षिक व्याजदर 9.30% ते 10% पर्यंत आकारण्यात येणार होता. कंपनीचा अंदाज आहे की, वेळेआधी देयके जमा केल्याने व्याजापोटी वार्षिक 1200 कोटी रुपयांची बचत होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या