Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी अव्वल तर अदानी दुसरे

Share

नवी दिल्ली | वृत्तसंस्था 

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी पुन्हा एकदा देशातील श्रीमंतांच्या यादीत अव्वल स्थानी कायम राहिले आहेत. तर अदानी समुहाचे सर्वेसर्वा उद्योजक गौतम अदानी हे दुसऱ्या स्थानावर आहेत. आज फोर्ब्सकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत ही माहिती देण्यात आली.

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या दहामध्ये उद्योजक हिंदूजा बंधू, बांधकाम क्षेत्रातील पलोनजी मिस्त्री, बँकर उदय कोटक, तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठे नाव असणारे शीव नादार, गुंतवणूकदार राधाकृष्ण दमानिया, गोदरेज कुटुंबिय, पोलाद उद्योजक लक्ष्मी मित्तल, उद्योजक कुमार बिर्ला यांचा समावेश आहे.

फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार ६२ वर्षीय मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ही ५१.४ बिलियन डॉलर (अंदाजे ३ लाख ७० हजार कोटी) इतकी आहे. तर दुसऱ्या स्थानी असणाऱ्या अदानी यांची संपत्ती १५.७ बिलियन डॉलर (अंदाजे १ लाख १५ हजार कोटी) इतकी आहे.

तर भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी अझीम प्रेमजी यांची दुसऱ्या स्थानावरुन १७ व्या स्थानावर घसरण झाली आहे.

मार्च महिन्यामध्ये प्रेमजी यांनी गरीब, वंचितासाठी देण्यात येणाऱ्या देणगीमध्ये तब्बल ५२,७५० कोटी रुपयांची वाढ केल्याने श्रीमंत व्यक्तीच्या यादीमध्ये त्यांची पडझड झाली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!