नगराध्यक्षा आदिकांना अश्‍लील पत्र; निषेधार्थ मूकमोर्चा

0

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्याबद्दल घृणास्पद, अश्‍लिल निनावी पत्र लिहिणार्‍याचा निषेध करण्यासाठी काल श्रीरामपुरातून महिला व पुरुषांचा सर्वपक्षीय मोर्चा निघाला. येत्या 15 दिवसात हे पत्र लिहिणार्‍याचा शोध लावून त्याच्यावर कारवाई न झाल्यास 15 दिवसांनी बांगड्या व लाटणे घेऊन पोलीस स्टेशन मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा मोर्चेकरांनी दिला.

दरम्यान, डीवायएसपी अरुण जगताप यांनी निवेदन स्वीकारून सदर प्रकरणी 499 प्रमाणे गुन्हा दाखल करत तपास करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर मोर्चा विसर्जित झाला.
या प्रकरणाबाबत शहर व तालुक्यातही संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. काल बुधवारी सकाळी स्टेशन मारुती मंदिरापासून सकाळी स्त्री-पुरुष आणि प्रमुख कार्यकर्त्यांसह मोर्चा निघाला.

श्रीरामपूरच्या राजकारणात असा प्रकार कधी घडला नाही. परंतु अनुराधा आदिक या नगराध्यक्षा झाल्याने काहींच्या पोटात पोटसुळ उठला, अशा वाईट प्रवृत्तींनी हे कृत्य केलेले आहे. नगराध्यक्षांसारख्या महिलेवर अशाप्रकारे वाईट लिखाण होत असेल तर सामान्य स्त्रियांनी राजकारणात यायचे की नाही? असा प्रश्‍न निर्माण होतो. त्यामुळे अशा प्रवृत्तीचा निषेध झाला पाहिजे. येत्या 15 दिवसात हे कृत्य करणार्‍या प्रवृत्तींना शोधून काढून त्यांच्यावर कारवाई न केल्यास यापेक्षा तीव्र आणि मोठा मोर्चा महिला हातात लाटणे आणि बांगड्या घेऊन काढतील, असा इशारा यावेळी भाषण करणार्‍या वक्त्यांनी दिला.

यावेळी जयंत चौधरी, राजेंद्र पवार, शिवसेनेचे महेश क्षीरसागर, सचिन बडधे, भाजपाचे किरण लुनिया, आरपीआयचे सुभाष त्रिभुवन, राष्ट्रवादीच्या अर्चना पानसरे, लकी सेठी, दीपक चव्हाण, साखर कामगारांचे नितीन पवार, नगरसेवक दीपक चव्हाण, रवी पाटील, केतन खोरे, रमादेवी धीवर, संतोष कांबळे, हिंदू एकताचे सुदर्शन शितोळे, भूमाताच्या अनिता शर्मा, अ‍ॅड. तुषार आदिक आदींची भाषणे झाली.

यावेळी अनित शर्मा, सुभाष गांगड, अर्चना पानसरे, स्नेहल खोरे, जयश्री शेळके, प्रणिती चव्हाण, संगीता बोरावके, उषा चौधरी, रेवती चौधरी, संतोष कांबळे, नगरसेवक राजेंद्र पवार, रवी पाटील, दीपक बाळासाहेब चव्हाण, किरण लुनिया, डॉ. शांतीलाल पाटणी, हंसराज आदिक, संतोष मोकळ, प्रकाश ढोकणे, संदीप मगर, सुदर्शन शितोळे, सुरेश ताके, सुभाष आदिक, अजय डाकले, सुभाष राजुळे, अण्णा पतंगे, राहुल उंडे, दीपक निंबाळकर, रावसाहेब तोडमल, प्रशांत खंडागळे, विठ्ठल पवार, जगदीश शर्मा, अनिरुद्ध भिंगारवाला, विजय खाजेकर, निखिल सानप, सुनील थोरात, भाऊसाहेब वाघ, रवी गरेला, तौफिक शेख, रमजान पटेल, सरवरअली सय्यद,

डॉ. मनोज छाजेड, डॉ. विलास आढाव, पंडीतराव बोंबले, बाबासाहेब मोरगे, सोहेल शेख, सुमीत मुथ्था, निरंजन भोसले, आकाश क्षीरसागर, शहराम शेटे, जयंत चौधरी, प्रकाश पाऊलबुद्धे, डॉ. बापूसाहेब आदिक, राजेंद्र पानसरे, नितीन पवार, विजय डावखर, रमजान पटेल, दत्तात्रय कांदे, दीपक दुग्गड, गणेश गणगे, अ‍ॅड. तुषार आदिक, अहमद जहागिरदार, सुधाकर आडांगळे, बाबासाहेब काळे, जगदीश शेटे, कैलास भागवत, विजय शेलार, डॉ. ललित सावज, सुरेश भोसले, सलीम जहागिरदार, अलीम शेख, सुभाष थोरात, वसंत पवार, विजय ठोकळ, विजय शेळके, प्रवीण फरगडे, रोहित श्यामलिंग शिंदे, सोहेल शेख, आदित्य आदिक, अर्जुन आदिक, योेगेश जाधव आदी उपस्थित होते.

तिघांविरूध्द गुन्हा दाखल –
नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांच्याविरोधात अश्‍लील भाषेत पत्र पाठविल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी रेवती जयंतराव चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादिवरून आरोपी रवि राजेंद्र भामरे, सिध्दार्थ गिरमे, कृष्णा पुंड या तिघाविरोधात गु.र.नं. 307/2017 प्रमाणे भा. दं. वि. कलम 292, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक श्री. शेवाळे हे करत आहेत.

 

LEAVE A REPLY

*