‘एसटी’ आता रुग्णसेवेचा वसाही स्वीकारणार

0

मुंबई | राज्य परिवहन महामंडळाचे १०० खाटांचे अतिविशेष रुग्णालय पुण्यातील सांगावी याठिकाणी उभे राहणार आहे. या रुग्णालयात बाह्य़ रुग्ण विभाग, शस्त्रक्रिया विभाग, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, स्कॅनिंग मशिन, रुग्णांसाठी 100 खाटा, 25 टक्के खाटा एसटी कर्मचाऱ्यांसाठी राखीव  राहणार आहेत.

रुग्णालयाच्या उत्पन्नातून नवी मुंबई येथे मोटार वाहन अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचाही एसटीचा विचार असून या महाविद्यालयात साधारण 100 पेक्षा जास्त जागा, 25 टक्के जागा एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.

राज्य परिवहनच्या कर्मचाऱ्यांचे पगार खूप चांगले नाहीत. अनेकदा त्यांच्या पाल्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते मात्र या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची मुले उच्च शिक्षण घेऊन शकणार आहेत.

LEAVE A REPLY

*