Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

लालपरीची हंगामी भाडेवाढ; ‘या’ बसेसला भाडेवाढीतून वगळले; साडेतीन हजार जादा बसेस धावणार

Share
विद्यार्थ्यांसाठी वेळांचे रास्त नियोजन करा; अनिल परब यांची एसटी महामंडळाला सूचना; MSRTC : Need to make planning for students travell - Anil Parab

मुंबई | प्रतिनिधी 

दरवर्षीप्रमाणे यंदाही सणासुदीच्या काळात एसटीने हंगामी भाडेवाढ केली आहे. लालपरीचे दहा टक्के दर उद्या मध्यरात्रीपासून लागून होतील अशी माहिती देण्यात आली आहे. शिवशाही(शयनयान), शिवनेरी आणि अश्वमेध या गाड्यांना मात्र हंगामी भाडेवाढीतून वगळण्यात आले आहे.

ऐन दिवाळीत एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर जास्तीचा भार येणार आहे. दरवर्षीप्रमाणे एसटी महामंडळाने यावर्षीही 10 टक्के भाडेवाढ केली आहे. 24 ऑक्टोबरला मध्यरात्रीपासून नवे दर लागू होतील. ही भाडेवाढ 5 नोव्हेंबर 2019 पर्यंत कायम राहिल.

भाडेवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी) आणि शिवशाही (आसन) या बसेसला लागू असेल अशी माहिती देण्यात आली आहे. तर
शिवशाही (शयनयान), शिवनेरी आणि अश्वमेध या बसेसला भाडेवाढ लागू होणार बसल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.

एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सूत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या दृष्टीने 30 टक्क्यापर्यत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला दिला आहे. या अधिकाराचा वापर करून एसटीने भाडेवाढ केली आहे.

एसटीची भाडेवाढ झाल्यानंतर प्रचंड गर्दीचा ओघ खासगी वाहतुकीकडे वाढतो यामुळे खासगी वाहतूकदेखील आपला तिकीटदर वाढवतात. यामुळे खासगी वाहतूकदेखील अतिरिक्त पैसे मोजून करावी लागते.


एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी गोड

गेली 4 वर्षे एसटी महामंडळातील सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्यात येते. यापूर्वी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त 10,000 रुपये अग्रिम देण्यात आला आहे. एसटी महामंडळात कार्यरत असणाऱ्या सुमारे 1 लाख 10 हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळीनिमित्त अनुक्रमे 2500 रुपये आणि 5000 रुपये इतकी रक्कम दिवाळी भेट म्हणून देण्यात येणार आहे. आचारसंहिता असल्याने याबाबतचा प्रस्ताव निवडणूक आयोगाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. निवडणूक आयोगाची परवानगी मिळताच कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्यात येईल, अशी घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली.


दिवाळीच्या जादा वाहतुकीसाठी एसटी सज्ज

दिवाळीच्या सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी विचारात घेता एसटी महामंडळातर्फे 24 ऑक्टोबर ते 05 नोव्हेंबर या कालावधीत विविध विभागातून सुमारे 3,500 बसेस सोडण्यात येणार आहेत. या लांब पल्ल्याच्या जादा वाहतुकीबरोबरच स्थानिक स्तरावर आवश्यकतेनुसार जादा बसेस सोडण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!