Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सुरक्षेच्या कारणास्तव रात्रभर गोदाकाठ अंधारात

Share

नाशिक | प्रतिनिधी 

गेल्या आठवड्याभरापासून धो-धो बरसत असलेल्या पावसामुळे नद्यांनी रौद्ररूप धारण केले आहे. ओसंडून वाहणाऱ्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असताना सुरक्षेच्या कारणास्तव महावितरणकडून रात्रभर वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचं निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गोदाकाठ रात्रभर अंधारात राहणार आहे.

गोदावरी नदीच्या पात्रानजीकचा विद्युत पुरवठा हा नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आज संपूर्ण रात्र बंद ठेवण्यात येणार असून महावितरणचे अधिकारी पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

ते ज्या भागात शक्य असेल अशा भागातला विद्युत पुरवठा नजीकच्या वाहिन्यांवर वळवण्यात आला आहे.  नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी अशा आपत्कालीन परिस्थितीत संयम ठेवावा व महावितरण ला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!