Type to search

maharashtra मुख्य बातम्या

वीज वितरणमध्ये 7 हजार जागांसाठी मेगा भरती

Share

26 जुलै शेवटची तारीख, 13 पासून अर्ज उपलब्ध

मुंबई- महाराष्ट्र वीज वितरण कंपनीत नोकरी करण्याची मोठी संधी आहे. इथे 7 हजार जागांसाठी मेगा भरती आहे. ही सरकारी नोकरी आहे. विद्युत सहाय्यक आणि उपकेंद्र सहाय्यक या पदांसाठी व्हेकन्सीज आहेत. विद्युत सहाय्यक या पदासाठी 5 हजार जागा आहेत, तर उपकेंद्र सहाय्यक जागांसाठी 2 हजार जागा आहेत.

अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची तारीष 26 जुलै 2019 आहे. यासाठी अर्ज 13 जुलैपासून बेबसाईटवर उपलब्ध होणार आहे. शैक्षणिक पात्रता-विद्युत सहाय्यक या पदासाठी 12वी उत्तीर्ण असण्याची गरज आहे. शिवाय त्याच्याकडे आयटीआयचा डिप्लोमा हवा. उपकेंद्र सहाय्यक पदासाठी 12वी उत्तीर्ण, आयटीआय डिप्लोमा आणि 2 वर्षांचा अनुभव हवा.

वयाची अट-26 जुलै 2019 रोजी 18 ते 27 वर्ष हवं. मागासवर्गीयांना वयात 5 वर्ष सूट. दिव्यांग आणि माजी सैनिकांना 18 वर्ष सवलत आहे.

नोकरीचं ठिकाण पूर्ण महाराष्ट्रभर असेल. 13 जुलैपासून अर्ज स्वीकारले जातील. https://www.mahadiscom.in इथे क्लिक करा.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!