MRP पेक्षा जास्त पैसे घेणाऱ्यांची थेट तक्रार करा! गिरीश बापट यांचे आवहान, जाणून घ्या कुठे कराल तक्रार!

0

देशात 1 जुलैपासून जीएसटी लागू झाली आहे.

मात्र अनेक ठिकाणी जीएसटीच्या नावावर छापील किंमतीपेक्षा ग्राहकांकडून जास्त पैसे उकळले जात असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे अशा विक्रेत्यांची थेट तक्रार करण्याचं आवाहन अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी केलं आहे.

तक्रार कुठे करणार?

ग्राहकांकडून छापील किंमतीपेक्षा अधिक दर घेऊन फसवणूक करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याची वैधमापन विभागाकडे तक्रार करता येईल.

  • Legal Metrology Maharashtra Consumer Grievances या फेसबुक पेजवर तक्रार करता येईल.
  • ९८६९६९१६६६ या व्हॉट्सअॅप क्रमांकावरही तक्रार करु शकता.
  • वैधमापन विभागाच्या dclmm_complaints@yahoo.com या ई मेल आयडीवर तक्रार करता येईल.
  • किंवा ०२२-२२६२२०२२ या हेल्पलाईन नंबरवर फोन करून तक्रार नोंदवता येईल.
  • अन्यथा संबंधित जिल्ह्यातील वैधमापन अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवण्याचं आवाहन गिरीष बापट आणि वैध मापन शास्त्र यंत्रणेचे नियंत्रक तथा विशेष पोलीस महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी केलं आहे.

LEAVE A REPLY

*