Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या सार्वमत

‘एमपीएससी’कडून 2020 चे वेळापत्रक जाहीर

Share
1744 परीक्षार्थीची टीईटीला दांडी, Latest News Tet Exam Upsent Student Ahmednagar

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी 2020 मध्ये होणार्‍या विविध परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा 5 एप्रिलला आणि मुख्य परीक्षा 8 ते 10 ऑगस्ट तर, महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 3मे रोजी होणार आहे, अशी माहिती ‘एमपीएससी’ने प्रसिद्ध केली आहे.

एमपीएससीकडून गेल्या तीन वर्षांपासून साधारण 21 नोव्हेंबरच्या आसपास परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येते. दुय्यम सेवा संयुक्त मुख्य परीक्षा पेपर क्रमांक एक 6 सप्टेंबर रोजी होणार असून , पेपर क्रमांक दोन (उपनिरीक्षक) 13 सप्टेंबरला, पेपर क्रमांक दोन (कर निरीक्षक) 27 सप्टेंबरला आणि पेपर क्रमांक दोन (सहायक कक्ष अधिकारी) 4 ऑक्टोबरला होणार आहे.महाराष्ट्र वन सेवा परीक्षा 2020 ची पूर्व परीक्षा 10 मे रोजी तर मुख्य परीक्षा 11 ऑक्टोबर रोजी होणार आहे. कृषी सेवा परीक्षा 1 नोव्हेंबर 2020 रोजी होणार आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!