कर सहाय्यक पूर्व परीक्षा 20 ऑगस्टला

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार 20 ऑगस्ट रोजी नगर शहारातील 9 उपकेंद्रावर कर सहायक पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी आतापासून तयारी सुरू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. रविवारी (दि. 20) शहारातील 9 उपकेंद्रांवर 3 हजार 384 परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत.

परीक्षेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून बैठकीचे नियोजन सुरू आहे. दरम्यान नियुक्त कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. परीक्षेसाठी वर्ग 2 च्या अधिकार्‍यांची समन्वयक अधिकारी, एक भरारी पथक, समवेक्षक-41, पर्यवेक्षक-33, सहायक-13, उपकेंद्र प्रमुख 9 आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.परीक्षावेळी मोबाईल, डायरी, मायक्रोफोन आदींना केंद्रामध्ये बंदी आहे. 100 मीटर परिसरात एसटीडी, फॅक्स, झेरॉक्स मशिन आदीवर बंदी राहणार आहे.

LEAVE A REPLY

*