Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका

Share

खासदार डॉ. सुजय विखे पाटील : मुख्य अभियंत्यांच्या उपस्थितीत रस्त्यांच्या प्रश्नांवर बैठक

अहमदनगर (प्रतिनिधी) – सार्वजनिक हितासाठी मी जनतेशी कटिबद्ध असून माझी बांधिलकी फक्त जनतेशी आहे. नगर शहरातील व जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था आता सहनशीलतेच्या पलीकडे गेली आहे. जिल्ह्यातील सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून ते वाहतुकीसाठी सुयोग्य करावेत. लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, अशा सक्त शब्दात खा. डॉ. सुजय विखे पा. यांनी बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना सूचना दिल्या.

नगर शहरातून जाणार्‍या सर्व राज्य व राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीच्या कामांचा कालबध्द कार्यक्रम हाती घ्यावा. जिल्ह्यातील सर्व बाह्यवळण रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण करावेत, शासनाकडे प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या कामांचे प्रस्ताव पाठपुरावा करुन मार्गी लावावेत अशा महत्त्वपूर्ण सूचना खा. डॉ. विखे पाटील यांनी यावेळी दिल्या.

नगर शहरासह जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी नगर येथे खासदार खा. डॉ. विखे पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम व त्या संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेतली. बैठकीत त्यांनी शहरासह जिल्ह्यातील रस्त्यांच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन यासंदर्भात तातडीने उपाय योजनांच्या करण्याचे सुचविले. बैठकीस प्रादेशिक विभाग नाशिकचे मुख्य अभियंता पी. बी. भोसले, अधीक्षक अभियंता जी. एस. मोहिते, कार्यकारी अभियंता सुरेश राऊत, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक दिवाण, जागतिक बँक प्रकल्प विभाग नगरचे अभियंता एन. एन. राजगुरु, कार्यकारी अभियंता मालुंडे, ए. बी चव्हाण, नगरचे प्रांताधिकारी अर्जुन श्रीनिवास, श्रीगोंद्यांचे प्रांताधिकारी सुरेश भोसले, पाथर्डी-शेवगावचे प्रांताधिकारी देवदत्त केकाण आदी उपस्थित होते.

रस्त्यांच्या कामाबाबत गांभिर्याने कार्यवाही करताना ते दळणवळणाच्या दृष्टीने नगर शहरासह जिल्ह्यातील मार्ग सुस्थितीत असावे, यासाठी संबधित सर्व एजन्सीजने कामाचा दर्जा राखावा. अर्धवट राहिलेली रस्त्यांची सर्व कामे कालबध्द नियोजन करुन पूर्ण करावीत. शहरातील भुयारी गटारींची कामे पूर्ण करुनच रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्याचे निर्देश खा. विखे पाटील यांनी दिले. रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीचा विषय आला की प्रत्येक विभागाकडे बोट दाखवून मोकळा होतो. त्यामुळे आज आपण सर्व विभागांची मुख्य अभियंता यांच्या उपस्थितीत बैठक घेतली आहे. शहरात अतिरिक्त वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे नवीन बाह्यवळण रस्त्याचे सर्वेक्षण तसेच असलेल्या बाह्यवळण रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!