Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या राजकीय सार्वमत

…तरी सरकार हे आघाडीचेच – सुप्रिया सुळे

Share

नगरमधून संवाद यात्रा

अहमदनगर (प्रतिनिधी) – निवडणूक जिंकण्याचा आत्मविश्‍वास कमी झाल्याने भाजप सरकार सत्तेचा गैरवापर करून दमदाटी करत आहे. जनतेचा आवाज दाबण्यासाठी सीबीआय, ईडीचा वापर केला जात आहे. भाजप-सेनेत गेेलेल्यांचा मूळ पिंड राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा राहणार आहे. भाजप-सेनेत गेलेल्यांना ते मंत्री करणार आहेत. निवडून कोणीही येवो, सत्ता कोणीचीही आली तरी सरकार आमचेच अर्थात आघाडीचे असेल असा दावाही राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी नगरमध्ये केला.तसेच युतीच्या सरकारने कोणाची काय चौकशी करायची ती करावी पण त्यात पारदर्शकता असाावी असे सांगत आघाडीत असताना वाईट दिसणार्‍यांना भाजप प्रवेशानंतर ‘क्लीनचीट’ मिळते कशी? असा सवालही त्यांनी केला.

नगरमध्ये पत्रकारांशी खा. सुळे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, राज्यातील पूरस्थिती, दुष्काळ, बेरोजगारी, महिला सुरक्षा यासह विविध विषयांवर सरकार अपयशी ठरले असून त्याबद्दल सर्वसामान्यांच्या मनात काय आहे. हे जाणून घेण्यासोबतच जनमाणसांपर्यंत पोहचण्यासाठी सुळे यांनी ‘संवाद यात्रा’ सुरू केली आहे. त्याची सुरूवात नगरमधून झाली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजश्री घुले, निर्मला मालपाणी, रेश्मा आठरे, अभिजीत खोसे, मंजुषा गुंड यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रवादी सोडून अनेकांचा भाजप प्रवेश सुरू असल्याकडे सुळे यांचे लक्ष वेधले असता त्या म्हणाल्या, भाजप सरकार सत्तेचा गैरवापर करून दमदाटी करत आहे. सीबीआय, ईडीचा धाक त्यासाठी दाखविला जात आहे. निवडणुकीत जिंकण्याचा आत्मविश्‍वास कमजोर झाल्याने हे सुरू आहे. आघाडीकडे जिंकून येणारेच भाजपात जात असल्याने आगामी काळात सत्ता कोणाचीही आली तरी सरकार मात्र आमचेच असणार आहे. सत्तेतील आमदारांचा मूळ पिंड हा आघाडीचा असल्याची पुष्टी खा.सुळे यांनी जोडली.

सरकारने धोरणात्मक निर्णय न घेतल्याने सामान्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. दिलासा मिळण्यासाठी कर्ज असणारे शेतकरी कोर्टात जात आहेत. 2014 पूर्वी जनतेला सीबीआय, ईडी काय असते याची माहिती नव्हती. भाजप सरकार आल्यानंतर हे शब्द लोकांना समजले. या यंत्रणाही पुढे आल्या. सरकारच्या विरोधात आवाज निघाला तर लगेचच फोन आणि ईडीच्या नोटिशी दिल्या जातात. तुमच्याकडे जनादेश असताना जनतेचा आवाज दाबण्याची गरज काय? असा सवाल खा.सुळे यांनी भाजप सरकारला विचारला. शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी अनेकदा एकमेकांवर टीका केली. मात्र त्यांच्यात कधी कटूता आली नाही. ते सुसंस्कृत राजकारण होते, आता मात्र राकीय संस्कृतपणा लोप पावून वेगळ्याच पध्दतीचे राजकारण सुरू असल्याचेही त्या म्हणाल्या.

पिचडांच्या पक्षांतराचे दु:ख – 
राष्ट्रवादीचे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या भाजप प्रवेशासंदर्भात बोलताना खा. सुळे म्हणाल्या, कोणतेही कारण नसताना ते भाजपात गेले. गत 40 वर्षांपासून ते पवार कुटुंबासोबत होते. त्यांनी पक्षांतर केल्याचे दुःख आमच्या मनात नेहमी राहील असे त्यांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!