ज्या दिवशी खरी कर्जमाफी तीच खरी दिवाळी – खा. सुप्रिया सुळे

0
नाशिक |  शासनाने शेतकऱ्यांनाकर्जमाफी मनापासून दिली नाही. यात अनेक अडचणी आल्या. अनेक शेतकरी यापासून वंचितदेखील राहिले. ही कर्जमाफी फसवी आहे,  ज्या दिवशी खरी कर्जमाफी  मिळेल तीच खरी दिवाळी असेल.  असे म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधला.

खा. सुळे नाशिक दौऱ्यावर आहेत. आज दुपारी मराठा विद्या प्रसारक समाजाच्या इंजिनियरिंग महाविद्यालयात खा. सुळे संवाद साधत होत्या. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली.

यावेळी खा. सुळे म्हणाल्या, विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच प्रात्यक्षिकांवर आधारित शिक्षण दिले गेले पाहिजे.  कायद्यात बदल करताना सर्वसामान्य  नागरिकांकडून फीडबॅक घेऊन कायदे बनवले पाहिजे. महाराष्ट्राने नविन युथ पॉलिसी देशाला दिली पाहिजे. युवकांचे प्रश सोडविन्यासाठी मी प्रयत्न करतेय. डिजिटलाइजेशन वर खर्च करण्यापेक्षा प्राध्यापकावर खर्च केला असता तर प्रश्न मिटले असते असेही त्या म्हणाल्या.

आम्ही सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू ठेवले आहे. ग्रामपंचायतीत राष्ट्रवादिला चांगले यश आले.  भाजप सेनेने नांदेडच्या पराभवाचे आत्मचिंतन करावे. सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी राष्ट्रवादी राज्यात सरकार विरोधात जास्त आंदोलन करत आहे.

शासनाचे दररोज नविन जीआर येत आहेत. कर्जमाफीही मनापासून केलेली नाही. कांदा प्रश्नावर सरकार आता दबाव आणत आहे. भाव पडण्यासाठी सरकार प्रयत्न करतांना दिसते. व्यापारी आणि शेतकार्यांवर होणाऱ्या दमबाजी विरोधात आंदोलन उभारू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

शिवसेना इज व्हेरी फनी पार्टी : सरकारमधून बाहेर पडण्याची शिवसेनेची धमकी केवळ विनोद आहे. सकाळी विरोध करायचा आणि रात्री एकत्र बसायचे असे आहे. शिवसेनेची भूमिका कोणालाच अद्याप समजली नाही. शिवसेना आणि भाजपच्या या डबल रोल मुळे कंटाळा आला असल्याचे खा. सुळे म्हणाल्या.

LEAVE A REPLY

*