Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

ममता हिरण्यकश्यप राक्षसाच्या वंशज : साक्षी महाराज

Share

सुरुवातीपासूनच भाजप आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अनेक वाद विकोपाला गेले होते. त्यातच आता नव्या वादाची भर पडली आहे. भाजप खासदार साक्षी महाराज यांनी ममता बॅनर्जी या त्रेतायुगातील राक्षस हिरण्यकश्यपच्या वंशज असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले.

लोकसभा निवडणुकीत भाजप आणि ममता बॅनर्जी यांच्यात वाद उफाळून आला होता. या वादाला आता उन्नावचे खा. साक्षी महाराज यांनी अजून भर पाडली आहे.

खा. साक्षी महाराज म्हणाले, ‘हिरण्यकश्यप नावाचा एक राक्षस होता. त्याचा मुलगा प्रल्हाद हा ‘जय श्रीराम’ म्हणायचा. त्यामुळं हिरण्यकश्यपनं त्याला तुरुंगात डांबले आणि त्याचा छळ केला. या कथेची पश्चिम बंगालमध्ये पुनरावृत्ती होत आहे. ममता बॅनर्जी या हिरण्यकश्यपच्या वंशज आहेत. तिथेही ‘जय श्रीराम’ म्हणणाऱ्यांना त्रास दिला जात असल्याचे ते म्हणाले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!