खासदार निधीतून शाळा वायफाय सुविधा देणार : खा. लोखंडे

0

मुख्याध्यापकांच्या एक दिवसीय चर्चासत्रास उत्स्फुर्त प्रतिसाद

अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील विद्यार्थी घडले पाहिजे. त्यांना आधुनिक सुविधा मिळाल्या पाहिजे, यासाठी खासदार निधीचा वापर करत आहे. राज्यात प्रथमच खासदार निधीतून शाळांना वायफाय इंटरनेटची सुविधा मिळावी, यासाठी बीएसएनएलला पत्र दिले आहे. खासदार निधीतून सर्व शाळांना तीन वर्षांकरीता मोफत वायफाय इंटरनेट सुविधा यामुळे मिळणार आहे. वायफाय इंटरनेटमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी चांगले आधुनिक शिक्षण घेऊ शकतील, असा विश्‍वास खासदार सदाशिव लोखंडे यांनी व्यक्त केला.

जिल्हा परिषद माध्यमिक विभाग व जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यध्यापकांच्या विविध समस्या व प्रश्‍नांजाणून घेण्यासाठी एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन नगर येथे करण्यात आले होते. या चर्चासत्राचे उद्घाटन खा.लोखंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक दिनकरराव टेमकर, वसंत लोढा, राज्य मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष अरुण थोरात, राज्य सचिव अदिनाथ थोरात, संयोजक व मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुनिल पंडित, नगर जिल्हा सचिव शांताराम डोंगरे, खजिनदार बाळासाहेब वाकचौरे, निरंतर शिक्षणाधिकारी सुनंदा ठुबे, उपशिक्षणाधिकारी उमेश डोंगरे, उपशिक्षणाधिकारी रामदास खेडकर, किशोर दळवी आदिंसह जिल्ह्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी खा.सदाशिव लोखंडे यांनी सांगितले की, कर्जत-जामखेड तालुक्याचा आमदार असतांना जिल्हा परिषदेच्या शाळांना तसेच विविध संस्थांच्या शाळांना भरघोस निधी दिला. राज्य मुख्याध्यापक संघ व जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून मुख्याध्यापक व शिक्षकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी कायमच चांगले प्रयत्न होत आहेत. आजच्या चर्चासत्रास मोठ्या संख्येने मुख्याध्यापक उपस्थित आहेत, त्यामुळे मुख्याध्यापकांची एकजूट दिसून आली. शिर्डी लोकसभेच्या निवडणुकीत विजयामध्ये मुख्यध्यापकांचे मोलाचे योगदान आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी शिक्षण उपसंचालक टेमकर म्हणाले, मुख्याध्यापक संघाने आयोजित केलेल्या या चर्चासत्रामुळे मुख्याध्यापकांचे बरेचशे महत्वाचे प्रश्‍न चर्चेली गेले आहेत. यावेळी ठुबे, खेडकर, थोरात, आदिंनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रास्तविकात संयोजक पंडित यांनी केले.

LEAVE A REPLY

*