Type to search

नाशिकमध्ये इतिहास घडणार; हेमंत गोडसेंना ५७ हजारांची निर्णायक आघाडी

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिकमध्ये इतिहास घडणार; हेमंत गोडसेंना ५७ हजारांची निर्णायक आघाडी

Share

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकमध्ये खासदार कधीच रिपीट होत नाही असे म्हटले जायचे. मात्र, यंदा शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांनी सलग दुसऱ्यांदा लोकसभेत जाण्याची तयारी केल्यामुळे हा इतिहास मोडीत निघण्याची शक्यता आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात यंदा शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे व राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्यातच खरी लढत असून गोडसे यांनी सहाव्या फेरीअंती निर्णायक आघाडी घेतली आहे.

गेल्या निवडणुकीत छगन भुजबळ यांचा पराभव करून हेमंत गोडसे मोदी लाटेत लोकसभेच्या तिकिटावर निवडणून आले होते.

सकाळपासून मतमोजणी सुरु आहे. नाशिकमध्ये सहाव्या फेरीअखेर गोडसे यांनी एकूण १ लाख ४३ हजार ९३४ मते मिळवली आहेत. यामुळे गोडसेंना ५७ हजार १५५ मतांची आघाडी मिळाली आहे. भुजबळ यांच्या पारड्यात ८६ हजार ७७९ मते पडली आहेत.

तर बहुजन विकासचे उमेदवार पवन पवार आणि अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांना जनतेने नाकारले.  नाशिक लोकसभा मतदारसंघात एकूण अठरा लाखांहून अधिक मतदार असून, यंदाच्या निवडणुकीत ५९ टक्के मतदान झाले होते.

गेल्या निवडणुकीत हेमंत गोडसे यांना ४ लाख ९४ हजार ७३५ मतं मिळाली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार छगन भुजबळ यांना ३ लाख ७ हजार ३९९ मतं मिळाली होती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!