Type to search

ध्यास स्वप्नपूर्तीचा : पाण्यासह कृषिक्रांती

माझं नाशिक

ध्यास स्वप्नपूर्तीचा : पाण्यासह कृषिक्रांती

Share
शासनाच्या प्रस्तावित नियोजनानुसार नार-पार-औरंगा व अंबिका या पश्चिम वाहिनी नद्यांवर 13 धरणे बांधून 11 टीएमसी पाणी गिरणा खोर्‍यासाठी उपलब्ध करून देणार आहे. त्यात कमीतकमी शेतकर्‍यांच्या जमिनी जातील व कमीतकमी पुनर्वसन करावे लागेल अशा धरणांच्या सुयोग्य साईटस निश्चित  करण्यात येणार आहेत. दुसर्‍या प्रकल्प अंतर्गत पार खोर्‍यातील पाणी पुणेगांवमध्ये टाकून 3.05 टीएमसी पाणी उपलब्ध करून दिंडोरी,चांदवड,येवला या तालुक्यांना त्याचा लाभ देण्यात येणार आहे.

हरिश्चंद्र चव्हाण, खासदार

नाशिक जिल्ह्यातून द्राक्ष, डांळींब, मनुका यांची मोठ्या प्रमाणात बांग्लादेशात निर्यात होते.मात्र,बांग्लादेशात यावर 100टक्के आयात कर लावला जातो. परिणामी शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागत आहे. यासाठी आपण लोकसभेत अधिसूचनेनुसार मुद्दा मांडला. तसेच केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभु यांना वेळोवेळी भेटून यात निर्यात धोरणाला होणारे नुकसान समजवून सांगितले. त्यासाठी सार्क देशांच्या बैठकीतही हा मुद्दा भारताकडून मांडण्यात आला आहे.

लोकसभेत जळवपास 600 प्रश्न आपण विचारले आहेत. 377 अधिसूचनेनुसार शुन्य काळातील मुद्दा किंवा सबमिशन यामध्ये वेळोवेळी शेती, दुष्काळ, शेतीसिंचन, द्राक्ष, डाळिंब कांदा, या विषयी प्रश्न लोकसभेत वेळोवेळी उपस्थित करंयाचा माझा विशेष प्रयत्न असतो.

ओझर मिग येथे 1964 मध्ये मिग लढाऊ विमान निर्मिती व मिसाईल निर्मित्ती करण्यासाठी कारखाना तयार झाला .या कारखान्यात जवळपास सहा हजारच्या आसपासप्रशिक्षित कुशल कर्मचारी आहेत. ओझर मिग हा अत्यंत आधुनिक असा विभाग आहे .ओझर मिग येथे काही अरब रुपयांची गुंतवणूक झालेली आहे .या विभागात लढाऊ विमानाचे सुटे भाग तयार करून .मिस्र,सायारीया,वियतनाम,मलेशिया,अल्जेरिया,और पोलंडला निर्यात मोठ्या प्रमाणात होते .तसेच येथे लढाऊ विमान दुरुस्तीही केली जाते .सध्या ओझर मिग येथे सुखोई 30 लढाऊ विमान तयार केले जाते .सुखोई लढाऊ विमान जगात प्रसिद्ध आहे .ओझर मिग येथे लढाऊ विमान विभागात लढाऊ विमान निर्मिती साठी प्रोजेक्ट सुरु व्हायला पाहिजे.ओझर मिग येथील हिंदुस्तान अरोनोटिक लिमिटेड येथे साधनांचा उपयोग करून युद्धा करिता भारत सदैव तयार राहणार.

मनमाड, मालेगाव, धुळे नरडाणा- इंदोर रेल्वे मार्ग मंजूरीसाठी मालेगाव लोकसभेचा खासदार असताना 2004 पासून लोकसभेत सातत्याने अर्थसंकल्पात प्रश्न विचारून किंवा अधिसूचनेद्वारा लोकसभेत सभागृहात मुद्दा मांडला. त्याची परिणीती 2009 मध्ये मनमाड इंदोर 350 किमी.चा रेल्वे मार्गाचा सर्वे पूर्ण झाला. 2009 ते 2014 पर्यंत अतिशय संथगतीने काम चालू होते. परंतु2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांनी हा प्रकल्प मंजूर केला.ना. नितीन गडकरी यांनी तो मूर्त स्वरुपात आणला.

या रेल्वे मार्गाला खरे श्रेय सुरवातीपासून लढा देणार्‍या सर्वांसह सुरेश प्रभु, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, डॉ. सुभाष भामरे यांना जाते.

राष्ट्रीय आरोग्य अभियांन अंतर्गत कळवाडी आरोग्य केंद्रासाठी 5 कोटी 60 लाख रुपये निमगाव आरोग्य केंद्रासाठी 5 कोटी 25 लाख , न्यायडोंगरीसाठी 3 कोटी 25 लाख, आरोग्य केंद्र पूर्नस्थापनेसाठी शासनाकडून मंजूर करून घेतले.
नाशिक येथून दिल्ली, कलकत्ता, हैद्राबाद विमान सेवा सुरू करण्यासाठी वेळोवेळी पाठपूरावा केला. यासाठी ना.सुरेश प्रभु यांचे मैत्रीपूर्ण संबंध कामाला आले. रेल्वे मंत्रालयात असतांना मनमाड- इंदोर रेल्वे सुरू करण्यास जशी मदत केली तशीच पून्हा सुरेश प्रभु यांनी नागरी विमान मंत्रालयाचा भार मिळाल्यानंतर प्रत्यय आला.त्यांनी त्वरित नाशिक-दिल्ली या विमान सेवेला सुरुवात करुन प्रत्यय दिला. 15 जून 2018 रोजी जेट एअरवेजची नाशिक- दिल्ली-नाशिक विमान सेवा सुरू करुन दिली.

समुद्रापासून पिण्याचे पाणी बनविण्यासाठी प्रयत्न आहेत.दमणगंगेचे पाणी नांदगाव,येवला,चांदवड,निफाड,दिंडोरी या तालुक्यांना मिळालेच पाहिजे,यासाठी लोकसभेत 377 अधिसुचेनुसार मागणी केली. दमणगंगेचे पाणी पालखेड समुहात आणण्यासाठी मी आग्रही आहे.याबाबतचा मुद्दा मांडताना आपण दमणगंगा(एकदरे)नदीजोड योजनेचे सर्वेक्षण केंद्र शासनामार्फत चालू असून ते फेर सर्वेक्षण करण्याची मागणी लोकसभेत केली आहे.एकदरे गांव हे पेठ तालुक्यातील दमणगंगा नदीवर आहे. दमणगंगा (एकदरे) नदीजोड योजनेचे फेर नियोजन करून सदरचे पाणी हे तुटीच्या पालखेड धरण समूहात वळवण्याबाबतच्या सूचना केंद्र सरकारला त्वरित द्याव्यात, अशी मागणी आपण केली आहे.दमणगंगा नदीजोड योजनेचे सर्वेक्षण केंद्र शासनामार्फत चालू आहे.एकदरेला लागूनच कादवा खोरे (पालखेड धरण समूह )आहे.

त्यातील वाघाड हे धरण एकदरे धरणाजवळ आहे.त्यामुळे एकदरे धरणाचे पाणी वाघाड धरणात आणणे सोयीचे आहे.त्यानंतर हे पाणी वाघाड ते करंजवण आणि नंतर करंजवण ते ओझरखेड असे प्रवाही बोगद्याद्वारे पाणी पालखेड समूहात आणता येईल. पालखेड समूहाची सिंचन क्षमता 70हजार हेक्टर आहे.दिंडोरी मतदारसंघातील पालखेड धरण समूह हे तुटीचे खोरे आहे. यातील धरणे दरवर्षी भरत नाहीत. त्यामुळे ही तूट भरुन काढण्यासाठी वरीलप्रमाणे योजना केल्यास नांदगाव,येवला,चांदवड दिंडोरी व निफाड या अवर्षणप्रवण तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सुटू शकतो.दमणगंगा (एकदरे) नदीजोड योजनेचे फेर नियोजन करुन सदर पाणी हे तुटीच्या पालखेड धरण समूहात वळविण्याबाबत आपण सभागृहाच्या माध्यमातून केंद्र सरकारला विनंती केली आहे.

दमणगंगा (एकदरे) नदीजोड योजनेचे फेर नियोजन केल्यास संपूर्ण नांदगाव ,येवला ,चांदवड ,निफाड ,दिंडोरी तालुक्यांना शेती व पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.तिसर्‍यांदा लोकसभेत प्रतिनिधित्त्व करत असल्यामुळे व अभ्यासपूर्ण पाठपुराव्यामुळे ना.नितीन गडकरी यांनी घोषित केलेल्या आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रस्तावित नदी जोड प्रकल्पा अंतर्गत दिंडोरी लोकसभा मतदार संघातील सर्वाधिक पाणी प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे.शेती सिंचनासह,पिण्याच्या पाण्याचा तसेच उद्योग धंद्यांना पाणी उपलब्धतेसाठी अंदाजित साडेतीन हजार कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाल्यामुळे सुरगाणा,कळवण,देवळा,नांदगावं,दिंडोरी,चांदवड,येवला व पेठ या तालुक्यांना नदीजोड प्रकल्पांचा सर्वाधिक फायदा होणार आहे.तसेच गिरणा खोर्‍यातील सटाणा,मालेगांवसह अन्य तालुक्यांनाही फायदा होणार आहे.

राष्ट्रीय जलविकास प्राधिकरण,नवी दिल्ली यांच्या अभ्यासानुसार नार-पार- औरंगा-अंबिका या पश्चिम वाहिनी खोर्‍यातील महाराष्ट्राच्या हद्दीतील पाणलोट क्षेत्राची 70 टक्के विश्वासार्ह जलनिष्पत्ती 813.44 दलघमी इतकी आहे.तसेच मुख्य अभियंता,जलविज्ञान,नाशिक यांचे अभ्यासानुसार 888.07 दलघमी इतकी आहे.या योजनेच्या सविस्तर सर्वेक्षण व अन्वेषणाचे काम वॅपकॉस लि.नवी दिल्ली यांच्यामार्फत डिसेंबर 2016 पासून प्रगतीत आहे.या कामाची किंमत362.42 लक्ष इतकी आहे. शासनास व राष्ट्रीय जलविकास प्राधिकरण,नवी दिल्ली यांना या योजनेचा पूर्व संभाव्यता अहवाल दि.25जुलै 2017 रोजी करण्यात आला असून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या13.51 कोटी किंमतीच्या अंदाजपत्रकास महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.

योजनेचे स्वरूप
पश्चिम वाहिनी नद्या व त्याच्या उपनद्यांवर 13 धरणे बांधून गिरणा खोर्‍यात पाणी वळविणे. या धरणाची 3 लिंक्स (योजना)मध्ये विभागणी करण्यात आली असून लिंक निहाय धरणाचा प्रस्तावित पाणीसाठा,स्थानिक वापर व गिरणा खोर्‍यात वळविण्यात येणारे पाणी यांचा तपशील खलीलप्रमाणे.

लिंकक्र.1 सोनगीर,उंबरपाडा,सारण्याअवन,प्रतापगड, बनपाडा,मुथिचापा लिंक क्र.2 राक्षसभुवन, मिलान, घोडी,देवंमाळ. लिंक क्र 3 उखडमाळ,सावरपाडा,मनखेड.सदर13 धरणांची 3 लिंक्समध्ये विभागणी केलेली असून त्यात 362.62 दलघमी (12.80 टीएमसी)पाणी साठविणे.या पाण्यापैकी 58.02 दलघमी पाणी (2.05 टीएमसी)इतका स्थानिक वापर व बाष्पीभवन व्यय वगळता उर्वरित 304.60 दलघमी (10.75 टीएमसी) वळविण्याचे नियोजन आहे.मांजरपाडा-2 चे पाणी पुढे चणकापूर धरणाच्या लाभ क्षेत्रात प्रवाही बोगदयाद्वारें सोडण्याचे नियोजन आहे.यात सुरगाणा तालुक्यातील 6600 हेक्टर सिंचनाचा समावेश प्रस्तावित करण्यात आला आहे.

[button color=”” size=”” type=”square” target=”” link=””]काही ठळक मुद्दे
आधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समुद्राचं पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी लोकसभेत तारांकित प्रश्न आणि 377 अधिसूचनेनुसार लोकसभेत सतत मुद्दा उठवला.
* पार तापी नर्मदा प्रकल्पातील जास्तीत जास्त पाणी उत्तर महाराष्ट्राला मिळावे यासाठी लोकसभेत 377 अधिसूचनेनुसार लोकसभेत चर्चा.
* वन अधिकार कायदा 2006 मध्ये वनअधिकार शासकीय समित्यांनी केलेला पक्षपात थांबवण्यासाठी लोकसभेत 377 अधिसूचनेनुसार चर्चा
* केंद्रीय विद्यालयातील आर्थिक व्यवहाराचा मुद्द्यावर लोकसभेत चर्चा केली. संबंधित मंत्रायलाशी पत्रव्यवहार.
* पेट्रोल आणि गॅस अशा ज्वलनशील पदार्थांची वाहतुकीदरम्यान होणारी गळती.
* केंद्रीय राखीव दलातील जवानांच्या कुंटुंबांच्या होणार्‍या हालअपेष्टेचा मुद्दा उचलला.
* अमली पदार्थ आणि बेकायदेशीर दारू विकण्याविरुद्ध जागरुकता अभियान
* किसान टी.व्ही. लवकर सुरू व्हावी, यासाठी मागणी.
* संकटग्रस्त पश्चिम अशियात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुखरुप सुटकेची मागणी.
* कांद्याला जीवनावश्क वस्तुंच्या यादीतून बाहेर काढण्यासाठी, तसेच कांद्याला किफायतशीर भाव निश्चित करणे. कांद्याला 2000 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव देणे.कांद्याला जीवनावश्क वस्तुंच्या यादीत आणण्याआधी सार्वजनिक चर्चा व्हावी.
* 2016-17 च्या केंद्रीय आर्थिक अर्थसंकल्पाच्या चर्चेदम्यान नाशिक जिल्ह्यासाठी आय.आय.एम. आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मेडिकल कॉलेजची मागणी.
* दिंडोरी येथे कृषी महाविद्यालय प्रस्ताव तयार करून त्याच्या मंजुरीसाठी प्रयत्न.
*नाशिक ते पेठ महामार्गाच्या मंजुरीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन केंद्राकडून राष्ट्रीय महामार्गाकरिता मान्यता घेतली.
* साक्री, सटाणा, देवळा, चांदवड, मनमाड, येवला, कोपरगाव, शिर्डी, राहुरी, अहमदनगर, कडा, बीड या 308 किमी[/button]

रस्त्यांची मंजुरी.
* वणी धोडंबा वडाळीभोई मंजुरीसाठी प्रस्तावित.
* वाझदा (गुजरात राज्य)पासून उंबरठाण,सुरगाणा,बोरगाव,अभोणा, कळवण,देवळा या रस्त्याच्या मंजुरीसाठी केंद्राकडे प्रस्ताव सादर.
* बार्‍हे,नणाशी,गोळशी फाटा रस्ता केंद्र सरकारकडुन मंजुर.
*आंतरराज्यमार्गाला त्रीभुवन , हट्टी, लाडगांव,बुबळी, कुंभीपाडा,चिकाडी, भनवड ,टिटवे,कोशंबी,लखमापूर,वरखेडा,चिराई ,बुबळी,साबरदरा,बिबळ-माणी-खोबळा,दूरपाडा,शिंगळचोंड,पळसन गुजरातबॉर्डरपर्यंत जोडले.
* राष्ट्रीय महामार्ग ओझर वडाळीभोई आणि उमराणे येथे अनेक प्रयत्नानंतर अंडरपास मुंजूर.
* रेल्वे ओव्हर ब्रिज निफाड- लासलगाव अंडरपास मुंजूर.
*ओझर विमानतळ सुरू करण्यासाठी राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हस्तांतरणासाठी प्रयत्न.
* रेल्वे मार्ग मंजुरी आणि सर्वेक्षण
* 2004 लोकसभेत गेल्यापासून मनमाड-मालेगाव-धुळे-नरडाणा- इंदोर रेल्वे मार्ग आणि नाशिक रेल्वे मार्ग मंजूर करण्यासाठी प्रयत्नशील. दोन्ही मार्ग मंजुरीसाठी सिंहाचा वाटा.
* पंतप्रधान आरोग्य निधीतून रुग्णांना आर्थिक मदत
* आवनखेड,ता.दिंडोरी गावात संसद आदर्श गाव योजनेतून विविध योजना समाविष्ट करून आदर्श गाव निर्मीतीस प्रयत्नशील.
* मांजरपाडा येथील पीडित शेतकर्‍यांना नुकसान भरपाईसाठी सहयोग.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!