Type to search

Featured सार्वमत

खासदार दिलीप गांधी यांच्यासह 64 जणांचे 67 शस्त्र परवाने रद्द

Share

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचा दणका

अहमदनगर (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणूक निर्भय, मुक्त, शांतपणे पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील 64 जणांचे 67 शस्त्र परवाने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी शनिवारी रद्दचा आदेश काढला. हे शस्त्र तत्काळ जमा करण्यास सांगण्यात आले असून शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 17 (3) (ब) नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करीत जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी ही कारवाई केली आहे. खासदार दिलीप गांधी, जिल्हा परिषदेचे माजी पदाधिकारी, माजी महापौर, जिल्हा बँकेचे संचालक व विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकारी यांचा समावेश आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांकडे शस्त्र परवाने रद्दचा प्रस्ताव सादर झाला होता. पोलीस अधीक्षक यांच्याकडून हा प्रस्ताव दाखल करताना लोकसभा निवडणूक निर्भय, मुक्त, शांततेत पार पाडण्यासाठी या शस्त्र परवानाधारकांवर गुन्हे दाखल आहे. त्यांचे शस्त्रे परवाने रद्द करून, शस्त्रे जमा करून घेण्याबाबत म्हटले होते. पोलीस अधीक्षकांकडून 69 गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींचे प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे सादर झाले होते. त्यापैकी 5 शस्त्र परवानधारकांचे शस्त्रपरवाने यापूर्वीच जिल्हादंडाधिकार्‍यांनी रद्द केले. या प्रस्तावांवर विचार करून 64 शस्त्र परवानाधारक व्यक्तींचे शस्त्रपरवाने जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी रद्द केले आहे. हा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक व संबंधित पोलीस निरीक्षकांना पाठविण्यात आला आहे. हे शस्त्र जमा करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.

यांचे शस्त्र परवाने रद्द
नगर शहर व तालुका : खासदार दिलीप गांधी, अंबादास गारुडकर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, सुनील डहाळे, अभिजित कोतकर, दीपक सिद्धवरम सुब्रमण्यम, नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, बापूसाहेब पालवे, रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी लॉरेन्स स्वामी, पोपट मोरे, जिल्हा परिषद सदस्य माधव लामखडे. नेवासे ः नानासाहेब तुवर, अशोक रामचंद्र गायकवाड, भाऊसाहेब मोटे. श्रीरामपूर ः शैलेश बाबरिया, श्यामलिंग शिंदे. संगमनेर ः भानुदास ढेरे. पाथर्डी ः राष्ट्रवादीचे नेते प्रताप बबनराव ढाकणे, दिनकर पालवे. श्रीगोंदे ः श्यामराव नागवडे, लक्ष्मण बोरुडे, खंडू कोळपे, तुळशीराम रायकर. पारनेर ः राहुल शिंदे, तान्हाजी इकडे, दादाभाऊ थोरात, काशिनाथ राठोड, खोडा ठोंबरे, दौलत पांढरकर, गजानन औटी, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजित वसंतराव झावरे, प्रभाकर रोहोकले, मधुकर उचाळे, संभाजी रोहोकले, शंकर नगरे. कोपरगाव ः अशोक रोहमारे, बाळासाहेब जगताप, नितीन औताडे, जयंत रोहमारे. राहाता ः नितीन कोते, नीलेश कोते. जामखेड ः दिलीप बाफना, हनिफ शेख, अंकुश ढवळे, किसन ढवळे. कर्जत ः बळीराम यादव, प्रसाद ढोकरीकर, सुरेश सांळुंके, अंबादास पिसाळ, लालासाहेब सुद्रीक, शांतीलाल कोपनर, मधुकर कोपनर, बाळासाहेब देशमुख, कैलास शेवाळे, पोपट गांगर्डे, प्रकाश भंडारी, पोपट अनभुले, गुलाब तनपुरे, मुबारक बादशाह मोगल, माणिकराव लोंढे, संभाजी भोसले, नितीन भोसले, शिवाजी पांडुळे, अविनाश दोषी.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!