Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

विखेंचा 64 तर जगतापांचा 61 लाखांचा निवडणुकीचा खर्च

Share

लोखंडे- कांबळे यांनी खर्च केले समसमान प्रत्येकी 59 लाख

अहमदनगर (प्रतिनिधी)- नुकत्याच झालेल्या लोकसभा शिर्डी व नगर या दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारांनी त्यांचा अंतिम खर्च जिल्हा निवडणूक शाखेकडे सादर केला आहे. यात सर्वाधिक 64 लाख रुपये खर्च नगर दक्षिणचे भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला आहे. तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांचा निवडणूक खर्च 61 लाख रुपये आहे. शिर्डीतील उमेदवार शिवसेनेचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे व आणि काँग्रेसचे उमेदवार आ. भाऊसाहेब कांबळे या दोघांचाही खर्च समान म्हणजे 59 लाख रुपये आहे.

मे महिन्यांत झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिर्डी आणि नगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविलेल्या उमेदवारांना त्यांचा अंतिम खर्च सादर करण्यासाठी 22 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. नगर लोकसभा मतदारसंघातून एकूण 19, तर शिर्डी मतदारसंघातून एकूण 20 उमेदवारांनी निवडणूक लढवली. या सर्वांनी पहिल्या, दुसर्‍या टप्प्यातील खर्च सादर केला होता. मात्र, अंतिम खर्च अद्याप बाकी होता. 23 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागून नगर मतदारसंघातून भाजपचे डॉ. विखे, तर शिर्डी मतदारसंघातून शिवसेनेचे खा. लोखंडे यांचा विजयी झाले. निकालानंतर महिनाभरात अंतिम खर्च सादर करावा, अन्यथा निवड झालेल्या उमेदवारांची निवड रद्द होते आणि जे पराभूत आहेत, त्यांनाही पुढे साडेपाच वर्षे निवडणूक लढवता येत नाही, असे निवडणूक आयोगाने या उमेदवारांना कळवले होते. त्यानुसार सर्वच उमेदवारांनी 22 जूनपूर्वी अंतिम खर्च सादर केला.

नगर मतदारसंघात डॉ. विखे यांचा खर्च सर्वाधिक 64 लाख 49 हजार 332 एवढा आहे. त्यानंतर आ. संग्राम जगताप यांनी 61 लाख 8 हजार 138 एवढा खर्च नोंदवला आहे. याशिवाय अपक्ष संजीव भोर 6 लाख 90, कमल सावंत 4 लाख 41 हजार, भास्कर पाटोळे 1 लाख, आबिद शेख 1 लाख 40 हजार, ज्ञानदेव सुपेकर 1 लाख 15 हजार, नामदेव वाकळे 1 लाख 55 हजार, सुधाकर आव्हाड यांनी 3 लाख 53 हजार खर्च नोंदवला आहे. शिर्डी मतदारसंघात काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांनी 59 लाख 79 हजार 132, तर शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांनी 59 लाख 73 हजार 183 रूपये एवढा खर्च केला आहे. याशिवाय अपक्ष भाऊसाहेब वाकचौरे यांनी 2 लाख 81 हजार, बन्सी सातपुते यांनी 7 लाख 42 हजार, सुरेश जगधने 4 लाख 39 हजार, प्रकाश आहेर 2 लाख 93 हजार, संजय सुखदान 14 लाख 46 हजार, प्रदीप सरोदे यांनी 8 लाख 52 हजार खर्च नोंदवला.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!