Saturday, April 27, 2024
Homeनगरविखेंची तालुकानिहाय हेल्पलाईन : जेवण, निवासाच्या सुविधेसाठी मदतीचा हात

विखेंची तालुकानिहाय हेल्पलाईन : जेवण, निवासाच्या सुविधेसाठी मदतीचा हात

अहमदनगर (प्रतिनिधी) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देश संपूर्णपणे लॉक डाऊन असल्याने संचारबंदीसोबतच वाहतूकही बंद आहे. या बंदीमुळे शेकडो नगरकर राज्य अन् देशाच्या कानोकोपºयात अडकून पडले आहेत. अनेक समस्यांचा सामना त्यांना करावा लागत अून त्यांच्या मदतीसाठी नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी हेल्पलाईन सुरू केली आहे. या माध्यमांतून संकटात सापडलेल्यांना मदत केली जाणार आहे.

अहमदनगर लोकसभा मतदार संघातील संघातील शेकडो विद्यार्थी, नागरिक इतर राज्यात अडकलेले आहेत. त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून त्यांचे आई-बाबा आणि नातेवाईक चिंतेत आहेत. इतर राज्यात अडकलेल्या नागरिकांना दिलासा मिळावा व ते जिथे आहेत तिथेच त्यांची व्यवस्थित सोय व्हावी या हेतूने खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी अहमदनगर मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यासाठी दोन हेल्पलाईन नंबर जाहीर केले आहे. या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधून इतर राज्यात अडकलेल्यांची माहिती कळवयाची आहे.

- Advertisement -

त्यानंतर स्वत: डॉ. सुजय हे त्या-त्या राज्यातील खासदारांशी संपर्क करून त्यांच्यामार्फत व्यवस्था करणार आहेत. नागरिकांनी हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन खा सुजय विखे पाटील यांनी व्हिडिओद्वारे केले आहे. लॉक डाऊन च्या पार्श्व•ाूमीवर परराज्यातील नागरिकांना परतता येत नसेल अशा नागरिकांनी घाबरून न जाता हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधल्यास त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासन खासदार डॉक्टर विखे पाटील यांनी यावेळी दिले. मालवाहतुकीसाठी आरटीओ परवानगी मिळण्यास विलंब होत असल्याचे खा. विखे यांनी आरटीओ दीपक पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. परवानगीची काही अडचण आल्यास संपर्क साधावा असे आवाहन खा.विखे यांनी केले आहे.
………………….

तालुकानिहाय हेल्पलाईन नंबर
नगर शहर- ९८३४०१०४७४/९८९०११५३८३, कर्जत – ९६०४०३५२३१/७४९८३६२१२९, पाथर्डी-९६०४४८७०८७/९९२१९९६९१७, अहमदनगर – ९६०४००७१११/७६२०५२१८११, जामखेड-९५०३९३७३०७/८४१२८४९३४४,शेवगाव-८८८८१८८५८१/८६६८९००२३६, पारनेर- ९६५७१९३५७०/९९७०५३९९०४, शेवगाव- ९८६०९८३४७६/९८२२२४८०३४, राहुरी- ९०२१७६८८१२/७५८८६०४२८०,

……………

अहमदनगर येथील डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलद्वारा २४ तास वैद्यकीय सेवा पुरविण्यात येणार असून ज्यांची अडचण असेल किंवा आरोग्य संबधी काही समस्या असतील त्या सर्वांसाठी डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल हे २४ तास खुले राहील अशी माहिती खासदार विखे पाटील यांनी यावेळी दिली .

- Advertisment -

ताज्या बातम्या