Friday, April 26, 2024
Homeनाशिकखा. डॉ. भारती पवार यांच्याकडून पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधीस एक कोटी रुपये

खा. डॉ. भारती पवार यांच्याकडून पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधीस एक कोटी रुपये

जानोरी | वार्ताहर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार देशातील कोरणा ग्रस्तांच्या मदतीसाठी दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ. भारती प्रवीण पवार यांनी कोविड-19 या आजाराचे गांभीर्य लक्षात घेत वाढत्या महामारीचा विचार करून देशभरात हाहाकार घातलेल्या कोरोनाच्या संसर्ग रोकाण्याच्या उपाय योजनाकरिता आपल्या खासदार स्थानिक विकास निधीतील 1 कोटी रुपये निधी तसेच एक महिन्याचे वेतन पंतप्रधान वैद्यकीय आर्थिक सहाय्यता निधीमध्ये वर्ग केले आहेत.

- Advertisement -

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश लॉकडाऊन करण्यात आला. सर्वत्र वाहतूक ठप्प झाली असून नाशिक जिल्ह्यातील बरेच नागरिक या- ना- त्या कारणास्तव बाहेरगावी तसेच परदेशात अडकून पडले आहेत.

जसजसे दिवस जात आहेत, तसतसे गावाकडे येण्याचा मार्ग अधिक कठीण होतो आहे. घरचे काळजी करतायेत तर संपूर्ण कुटुंब काळजीत पडले आहेत.

अशा खडतर काळात दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ.भारती पवार यांच्याकडे नागरिक आपले कुटुंब, नातेवाईक, मित्र अडकले असल्याचे असे सांगत असून मदतीची विनवणी करत आहेत.

त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, त्या-त्या भागातील प्रशासकीय यंत्रणा तसेच परराज्यातील खासदार, जिल्हाधिकारी वेळप्रसंगी पी.एम.ओ. ऑफिस दिल्ली येथे संपर्क साधून जिल्ह्यातील  नागरिकांना खा. डॉ. पवार तसेच कार्यालयीन सहकारी व पदाधिकारी हे मदत करीत आहेत. त्याचप्रमाणे सातत्याने शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणावर शेतमालाचे नुकसान न होता दिलासा देत मदतकार्य सुरूच आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या