‘हिरो’ ठरला ‘झिरो’

0

मुंबई : नुकताच शाहरुखचा झिरो हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वी करण्यात आलेल्या प्रमोशनमुळे ट्रेलर आणि गाणी मस्त गाजली. पण चित्रपट गृहात झिरो प्रेक्षकांच्या नजरेतूनही झिरो झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

किंग शाहरूख खान, कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा या तिघांचा हा चित्रपट असून सिनेमाने अगदी जोरदार ओपनिंग केली होती. पण दुसऱ्या दिवसांपासून प्रेक्षकांच्या हातात निराशा आल्याने हा चित्रपट पुरता आपटला आहे.

झिरोमधील शाहरूख खानचा अभिनय प्रेक्षकांनी पसंत केला आहे. पण सिनेमाची गोष्ट आणि दिग्दर्शन तेवढं चांगल नसल्याचं म्हटलं जात आहे.शाहरूखच्या आणि चाहत्यांच्या झिरो या सिनेमाकडून खूप अपेक्षा होत्या. हा सिनेमा सुपरहिट ठरेल अशी चाहत्यांना आशा होती. पण तसं काही घडलं नाही.

‘झिरो’ हा सिनेमा भारतात जवळपास 4,400 स्क्रीनवर रिलीज करण्यात आला आहे. तर विदेशात हा सिनेमा जवळपास 1,500 स्क्रीन्सवर दाखवण्यात आला आहे. झिरोकरता पहिला आठवडा सर्वात महत्वाचा असणार आहे. कारण या सिनेमाचं बजेट 200 करोड रुपये असून या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित झालेला हा सिनेमा बिग बजेट सिनेमा आहे.

LEAVE A REPLY

*