MOVIE REVIEW : ‘ट्यूबलाइट’

0

कबीर खान आणि सलमान खान यांचा ‘ट्यूबलाइट’ हा एकत्र तिसरा चित्रपट आहे.

रेटिंग : 3.5 /5


कथा : 
ही कथा दोन भाऊ भरत सिंह बिष्ट(सोहेल खान) आणि लक्ष्मण सिंह बिष्ट (सलमान खान) यांची आहे.
लक्ष्मण थोडासा लहान मुलांसारखा वागतो. भावावर म्हणजे सोहेल साकारत असलेल्या ‘भरत’वर त्याचं जीवापाड प्रेम असतं.
पण, चित्रपटात खरं भावनिक वळण तेव्हा येतं जेव्हा सैन्यदलातील नोकरीवर रुजू होण्यासाठी भारत- चीन युद्धाच्या कारणास्तव भरतला जावं लागतं. या दृश्यांमध्ये सलमानच्या अभिनयाने अनेकजण भावूक होतात. युद्धाच्या कारणाने देशाच्या संरक्षणासाठी लढावयास गेलेला भरत काही परत येत नाही. त्याचं आपल्यासोबत नसणं लक्ष्मणच्या जीवनाला एक वेगळंच वळण देऊन जातं. त्यातच माटिन रे तंगू (गुओ) आणि झू झू यांच्या भूमिकांनाही अधोरेखित करण्यात आलं आहे.
मध्यांतरानंतर जेव्हा लक्ष्मणला अनेक गोष्टींची जाणीव होते, आणि आपण आपल्या भावाला परत आणू शकतो अशी भावना त्याच्यात असते. अर्थात त्याच्या या प्रयत्नांना यश मिळतं की नाही हे चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला कळेलच.
दिग्दर्शन : 
चित्रपटाचे दिग्दर्शन उत्कृष्ट आहे. सिनेमॅटोग्राफी, लोकेशन्सही कथेनुसार चांगले आहेत.
कोणत्याही गोष्टीवर असणारा आपल्या अंतर्मनाचा विश्वास नेमका किती महत्त्वाचा असतो याचं चित्रण ‘ट्युबलाइट’मध्ये कबीर खानने केलं आहे. कबीर खान यांना नेहमी प्रत्यक्षात लोकेशनवर शूट करायला आवडते. त्यामुळे चित्रपटात कथा अधिक चांगली वाटते. कॅमेरावर्क आणि फ्लोदेखिल चांगला आहे.
चित्रपटाची कथा अत्यंत इमोशनल आहे. सलमान खानच्या टिपिकल स्टाइलपेक्षा ती अत्यंत वेगळी आहे.

कलाकारांचा परफॉर्मन्स : 

सलमान खानने या चित्रपटात चांगला अभिनय केला आहे. त्याच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी हा एक चित्रपट आहे असे म्हणता येईल.
त्याच्या चेहऱ्यातील निरागसपणा आणि डोळ्यातील पाणी कोणाच्या डोळ्यात पाणी आणू शकते. सलमानशिवाय आता या जगात नसलेले अभिनेते ओम पुरी यांचे कामही सुंदर आहे.
चाइल्ड आर्टिस्ट मेटिननेही चांगले काम केले आहे. चायनीज अॅक्ट्रेस जू जू चे कामही उत्कृष्ट आहे. मोहम्मद झिशान अयूबने सराहनीय काम केले आहे.
या चित्रपटाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे किंग खानची भूमिका. शाहरुखची पाहुण्या कलाकाराची भूमिका चांगली रंगवण्याची संधी कबीरने सोडली नाहीये.
संगीत : 
चित्रपटाचे संगीत चांगले आहे. ‘टयुबलाइट’मध्ये असलेली गाणी त्या त्या प्रसंगांना अगदी साजेशी आहेत.
संगीतकार प्रितम आणि ज्युलियस पॅकियम यांच्या अनोख्या शैलीत ही गाणी सध्या अनेकांच्या प्लेलिस्टचा भागही झाली आहेत.
चित्रपटाचा बॅकग्राउंड स्कोअरही चांगला आहे.
पाहावा की नाही : 
सलमान खानचे चाहते असतील नक्कीच बघा!

LEAVE A REPLY

*