स्टार : 3 स्टार्स 

अली अब्बास जफर दिग्दर्शित फिल्म ‘टायगर जिंदा है’ शुक्रवारी प्रदर्शित झाली आहे. 2012 मध्ये प्रदर्शित ‘एक था टायगर’ फिल्मचा हा सीक्वेल आहे. याआधी सलमान खान आणि अली अब्बास जफरने ‘सुल्तान’मध्ये एकत्र काम केले होते.

  • कथा : ‘टायगर जिंदा है’ फुल टू अॅक्शन पॅक आणि देशभक्तीवर आधारीत फिल्म आहे.

फिल्मची कथा 40 नर्सेसला वाचवण्याच्या मिशनने सुरु होते . या मिशनवर टायगर (सलमान खान) आणि जोया (कतरीना कैफ) काम करत असतात. या 40 नर्सेसमध्ये 25 भारतीय आणि 15 पाकिस्तानी नर्स असतात. या नर्सेसना इराकमध्ये आयएसआयने किडनॅप केलेले असते. अमेरिका इराकवर बॉम्ब हल्ला करण्याच्या तयारीत असते. त्यांनी भारताला नर्सेसना सोडवण्यासाठी 7 दिवसांचा अवधी दिलेला असतो. या 7 दिवसांत जर भारताने नर्सेसना सोडवले नाही तर अमेरिका बॉम्ब हल्ला करणार असते. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या नर्सेस अडकलेल्या असल्याने दोन्ही देश संयुक्त कारवाई करतात. या कामासाठी भारताकडून टायगरची निवड होते. तर पाकिस्तानमधून जोया असते. अॅक्शन आणि ड्रामाने भरपुर असलेल्या या सिनेमात टायगर आणि जोया आयएसआयच्या अड्ड्यापर्यंत पोहोचतात का, ते नर्सेसना सोडवण्यात यशस्वी होतात का? तसेच  या मिशनमध्ये टायगर आणि जोयाला कोणकोणत्या संकटांचा सामना करावा लागतो  हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपटगृहात जाऊन फिल्म पाहावी लागेल.
  • दिग्दर्शन : अली अब्बास जफरने ‘टायगर जिंदा है’चे उत्कृष्ट दिग्दर्शन केले आहे.

सलमान आणि कतरीनाने तुफान अॅक्शन सीन्स केले आहेत. बर्फांच्या डोंगरावरील अॅक्शन आणि जंगली प्राण्यांसोबत सलमानचे सीन्स खूप छान पद्धतीने हाताळले आहेत. त्यासोबतच सलमानचे डायलॉग्ज देखील छान जमून आले आहेत.

  • कलाकार : आपल्या जबरदस्त अॅक्शनसह सलमान पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

फिल्ममध्ये सलमानचा परफॉर्मन्स कडक आहे. सलमान फिल्ममध्ये असताना कतरीना देखील स्वतःची उपस्थिती जाणवून देते. दोघांनीही लाजवाब अॅक्शन सीन्स केले आहेत. फिल्ममधील इतर कलाकारांनीही आपापली भूमिका योग्य निभावली आहे. व्हिलनची भूमिका साकारणारा इराणी अॅक्टर सज्जाद डेलाफ्रूजने तर सर्वांचे मन जिंकले.

  • संगीत : फिल्मचे संगीत चांगले आहे.

गाण्यांची कोरिओग्राफी चांगली झाली आहे. बॅकग्राऊंड म्यूझिकही प्रत्येक सीनला योग्य असेच आहे. फिल्म प्रदर्शित  होण्यापूर्वीच ‘स्वैग से स्वागत’ आणि ‘दिल दिलान गल्ला’ हिट झाले होते.

  • पाहावा कि नाही : अॅक्शन फिल्मचे तुम्ही चाहते असाल तर ही फिल्म नक्की पहा!

  

LEAVE A REPLY

*