MOVIE REVIEW : ‘सचिन : अ बिलियन ड्रीम्स’, क्रिकेटच्या सोनेरी इतिहासाचे सचिनपर्व!

0

स्वप्नाचा पाठलाग करण्यासाठीचं नव्याने बळ देणारा ‘सचिन – अ बिलियन ड्रीम्स…’ आज आपल्यासमोर सचिनचा इतिहास सांगतो.

क्रिकेटच्या सोनेरी इतिहासाचे साक्षीदार करणारं हे सचिनपर्व आहे.
एखाद्या खेळाडूच्या जीवनावरची डॉक्युमेंट्री कशी असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे सचिनचा हा सिनेमा आहे.
कथा 
ही कथा मास्टर ब्लास्टर सचिन (सचिन तेंडुलकर) ची आहे. साराच्या जन्मापासूनच सिनेमा सुरू होतो. हा सिनेमा बघताना तुमच्या अंगावर काटा येतो, तुम्ही पोट धरून हसता आणि तुम्ही काही प्रसंगांमुळे रडताही…
सचिन आणि अंजलीने लग्न करण्याचा विचार केला त्यावेळी सचिन घरी सांगायला घाबरत होता. अखेर, अंजलीच त्याच्या घरी गेली आणि ‘सचिनला माझ्याशी लग्न करायचं आहे,’ असं सांगून टाकलं. हे सर्व छोटे छोटे प्रसंग थिएटरमध्ये बघताना पोट धरून हसायला येतं. तर काही प्रसंग भावूक करून जातात. टेंशनमध्ये असल्यावर सचिन बप्पी लहरी यांचं कोणतं गाणं दिवसभर ऐकायचा हे कळल्यावर प्रेक्षक पोट धरूनच हसतील यात काही शंका नाही.
बालपणी शिवाजी पार्कमध्ये प्रॅक्टीस करणे, गुरू आचरेकर सरांकडून ट्रेनिंग घेणे, मग हळू हळू लहानपणी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरवण्याच्या दिशेने वाटचाल करण, पहिली वन डे मॅच, क्रिकेटमध्ये सोसावी लागलेली टीका, पहिले शतक ,सर्व पैलूंबरोबरच जीवनात दोन मुलांचे येणे आणि क्रिकेटला अलविदा करणे हे सर्व चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
डायरेक्शन..
चित्रपटाचे दिग्दर्शन अतिशय उत्तम आहे.
सगळ्या सीनसाठी करण्यात आलेले नाट्य रुपांतर आणि त्यासोबतच प्रत्यक्ष काही व्यक्तींना अशाप्रकारे एकत्रित करण्यात आले आहे की, चित्रपट तुम्हाला खिळवून ठेवतो.
या सिनेमाचं संपूर्ण श्रेय जर कोणाला द्यायचं झालं तर ते दिग्दर्शक जेम्स अर्स्किन यांनाच द्यावं लागेल यात काही शंका नाही. ज्यापद्धतीने त्यांनी हा डॉक्यू-ड्रामा तयार केला आहे याला तोड नाही असेच म्हणावे लागेल.
यामध्ये मिसाइल लाँच, राजीव गांधी हत्या, 1992चं खुले आर्थिक धोरण – जागतिकीकरण 2008 चा मुंबईवरील हल्ला या सगळया गोष्टींचे दाखले मिळतात… एकीकडे क्रिकेट खेळलं जात असताना भोवताल कसा होता, याच्याशी सांधलेपण दाखवण्याचा प्रयत्न वेगळा अन् उत्तम कलाकृती दिग्दर्शक जेम्स रस्किन यांनी सादर केली आहे.
कलाकार : नाट्य रुपांतर केलेल्या पात्रांनी चांगले काम केले आहे.. पण त्याचबरोबर प्रत्यक्षात वीरेंद्र सेहवाग, धोनी, रवी शास्त्री, सचिन , अंजली, सारा आणि अर्जुन यांचे चित्रणही उत्कृष्टपणे केले आहे. अमिताभ बच्चन, हर्षा भोगले   यांचा अपियरन्सही चांगला आहे.
संगीत.. 
चित्रपटाचे संगीत आणि बॅकग्राऊंड स्कोअर उत्तम आहे. काही ठिकाणी संगीत अत्यंत प्रेरणादायी वाटते..
पाहावा की नाही.. 
क्रिकेटचे चाहते असाल आणि मास्टर ब्लास्टर सचिनच्या जीवनाची कहानी जाणून घ्यायची असेल तर नक्की पाहा..

LEAVE A REPLY

*