MOVIE REVIEW : ‘न्यूटन’

0
मराठमोळ्या दिग्दर्शक अमिक मसूरकर यांनी अमित भारतातील निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उठवणारा चित्रपट बनवला आहे ज्याचे नाव आहे ‘न्यूटन’.
‘न्यूटन’ या आपल्या दुसऱ्याच चित्रपटातून लोकशाही व्यवस्था आणि निवडणुका ही आपल्या समाजव्यवस्थेची दरवर्षी रंगणारी सर्कस दाखवताना दिग्दर्शक अमित मसूरकर यांनी या व्यवस्थेतील मूळ विसंगतीवरच अचूक बोट ठेवले आहे.

 

कथा : ही कथा आहे नूतन कुमार (राजकुमार राव) याची. जो दहावी बोर्डाच्या परीक्षेत त्याचे नाव बदलून न्यूटन ठेवतो. त्यानंतर तो फिजिक्समधून M.sc करतो आणि नंतर इलेक्शन बोर्डामध्ये कामाला लागतो. यादरम्यान त्याची ड्युटी छत्तीसगढ येथे लागते. ही अशी जागा असते जिथे आजपर्यंत वोटींग झालेले नसते. लोकनाथ(रघुवीर यादव) यांच्यासोबत पूर्ण टीम जंगलात जाते. पोलीस आत्मा सिंह(पंकज त्रिपाठी) यांच्या निगराणीत वोटींगचे काम असते. सर्वांना वाटत असते की तिथे वोटींग होणार नाही पण न्यूटनला विश्वास असतो की वोटींग होईल. पण गोष्टी बदलतात आणि एक खास रिपोर्ट समोर येतो. तो काय असतो ते पाहण्यासाठी आपल्याला चित्रपट पाहावा
लागेल.

 

दिग्दर्शन :  चित्रपटाचे दिग्दर्शन सुंदर झाले आहे. जंगलामध्ये शूटिंगचे सीन फार छान आहेत. दोन टोकाची मते असलेले हे अधिकारी जसे आहेत. तसेच यातला सुवर्णमध्य साधत हरएक व्यवस्थेत फिट बसण्याचा प्रयत्न करणारी सामान्य जनता या अर्थाने न्यूटनचे सहकारी लोकनाथ (रघुवीर यादव), शंभुनाथ (मुकेश प्रजापती) आणि माल्को (अंजली पाटील) यांचीही बाजू दिग्दर्शकाने ठळकपणे मांडली आहे. या एवढय़ा व्यक्तिरेखा एकत्र आल्यानंतर त्यातून रंगणारी व्यवस्थेची सर्कस दिग्दर्शकाने अत्यंत प्रामाणिकपणे मांडली आहे.

अभिनय : काही न बोलता, केवळ डोळ्यांतून भाव व्यक्त करणे हे राजकुमारच्या अभिनयाचे प्रभावी अस्त्र आहे ज्याचा त्याने यात पुरेपूर वापर केला आहे. त्याला तितकीच तगडी साथ गेल्या काही दिवसांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिकेंमधून दाखवणाऱ्या पंकज त्रिपाठींनी आत्मा सिंगच्या भूमिकेत दिली आहे. संजय मिश्रा यांनीही त्यांची भूमिका उत्तम साकारली आहे. अंजली पाटीलसह बाकीच्या कलाकारांचे कामही फारच चांगले आहे

संगीत : चित्रपटाचे संगीत आणि बॅकग्राउंड स्कोर उत्तम आहे.

पाहावा की नाही  : प्रभावी व्यक्तिरेखा, त्यांचे वास्तववादी चित्रण आणि तरीही कोणाला न दुखावता, चिमटे न काढताही जे आहे ते मांडत विचार करायला लावणारा ‘न्यूटन’ हा सर्वार्थाने वैचारिक ताकदीचा चित्रपट आहे. उत्तम कास्टींग असलेला चित्रपट पाहायचा असेल तर हा चित्रपट नक्की बघा.

 

LEAVE A REPLY

*