युनेस्कोने ‘जागतिक सांस्कृतिक वारसा’ म्हणून जाहीर केलेले कर्नाटकातील एक अतिशय सुंदर शहर म्हणजे ‘हंपी’. हंपी’ या चित्रपटात हंपी हे फक्त एक शहर नसून एक अतिशय सकारात्मक असं व्यक्तिमत्त्व आहे.

समजा अनेक मित्र /मैत्रिणींनी एकत्र बाहेर जायचा प्लॅन केला आणि ट्रीपला जायच्या वेळी अचानक काही मित्रांनी/मैत्रीणीने प्लॅन रद्द केला, तेव्हा तुम्हीचा प्लॅनच रद्द करता का?  ‘हंपी’ सिनेमा पाहिल्यानंतर तुमचा या सगळ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलेल. आपण आपल्या आयुष्यात एवढे गुंतलेले असतो की, त्याहून वेगळंही आपले  आयुष्य आहे याचा विचार करायला लावणारा  ‘हंपी’ सिनेमा.

कथानक :

मुंबईची ईशा(सोनाली कुलकर्णी) तिच्या आयुष्यातील समस्यांपासून दूर पळण्यासाठी ‘हंपी’मध्ये येते.त्यानंतर ईशाची भेट आधीपासून तिथे असलेल्या कबीरशी (ललित प्रभाकर) होते. ईशाचा आधीच माणसांवरचा विश्वास उडाला असतो. तिला माणसांचाच राग येतो. पण कबीर तिला त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. दोघे सोबतच ‘हंपी’ फिरतात. ऎकमेकांचे विचार शेअर करतात. या दोघांची मैत्री फुलवण्यात गिरीजाची (प्राजक्ता माळी) मदत होते. सिनेमात तिघांच्याही लुकमध्ये बदल जाणवतो. आतापर्यंत ललित आणि प्राजक्ताला आपण साध्या लूकमध्ये पाहिले आहे. हंपी सिनेमामुळे त्यांचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळणार आहे. ‘सगळी माणसं वाईटच असतात’ असं म्हणणाऱ्या ईशाला हंपी आणि तिथे भेटलेली माणसं बदलवू शकतात का, हे सिनेमात दाखवण्यात आले आहे.

दिग्दर्शन :

‘कॉफी आणि बरंच काही’ आणि ‘अ‍ॅन्ड जरा हटके’ या सिनेमानंतर दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांचा आता ‘हंपी’ हा सिनेमा घेऊन आले आहेत. दिग्दर्शकाने आपल्या व्हिज्युअलायझेशनने आणि सिनेमटोग्राफरने कॅमेराच्या नजरेतून ‘हंपी’चं सुंदर दर्शन घडवले आहे.

अभिनय :

सोनाली कुलकर्णी एका वेगळ्या आणि चांगल्या भूमिकेत दिसली आहे. सोनालीने अनेक दृश्यांमध्ये ईशाचं दु:ख फार चांगल्या प्रकारे मांडले आहे. ललित प्रभाकरने सुद्धा छान काम केलंय. प्राजक्ता माळीनेही चांगले काम केले आहे. तीचा बोल्ड अवतार प्रेकक्षांची मने नक्की जिंकेल. छोटी पण लक्षात राहणारी भूमिका प्रियदर्शन जाधव याने केली आहे. तो जेव्हा जेव्हा स्क्रिनवर आला चेह-यावर हसू येतं.

लेखन :

अदिती मोघे यांनीच प्रकाश कुंटे यांच्या आधीच्या दोन्ही सिनेमांचं लेखन केलं होतं. याही सिनेमाची कथा, पटकथा आणि संवाद त्यानीच लिहिले आहेत. पटकथाही चांगली झाली आहे.

पाहावा कि नाही :  नक्की एकदा तरी नक्की पहा!

तुम्ही ट्रॅव्हल लव्हर असाल तर कदाचित हा सिनेमा तुम्हाला अधिक आवडू शकतो.

रेटींग – 3 स्टार

निर्मिती संस्था : स्वरूप समर्थ एंटरटेनमेंट 
निर्माते : योगेश भालेराव 
दिग्दर्शक : प्रकाश कुंटे 
कथा- पटकथा-संवाद : अदिती मोघे 
कॅमेरा : अमलेंदू चौधरी 
संकलन : प्राची रोहिदास 

LEAVE A REPLY

*