MOVIE REVIEW : ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’

0
रेटिंग 3.5

 

‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ चित्रपट अलंकृता श्रीवास्तव यांनी दिग्दर्शित केला आहे. अनेक वादांनंतर हा चित्रपट अखेर रिलीजसाठी तयार आहे.

कथा : चित्रपटाची कथा अत्यंत साधी पण प्रभावित करणारी आहे.
ही कथा उषा (रत्ना पाठक-शाह), लीला (अहाना कुमरा), शिरीन (कोंकणा सेन शर्मा ) आणि रिहाना (प्लाबिता) यांच्या भोवती फिरते. बुआ उर्फ उषा जींना रोमँटिक कादंबऱ्या वाचण्याची आवड आहे. लीलाचे स्वप्न आहे की, फोटोग्राफर अरशद (विक्रांत मास्सी) बरोबर शहर सोडून दिल्लीला पळून जावे. शिरीन तिचा पती (सुशांत सिंह) आणि तीन मुलींबरोबर एक प्रचंड निर्बंध असलेले जीवन जगत असते. पण न सांगता ती सेल्स वुमनचे काम करत असते. तर अनेक निर्बंध असूनही रिहानाला इंग्रजी गाण्याची आवड आहे. घरातून निघताच ती तिच्या जगात परतते आणि मस्ती करत असते. या चारही महिलांच्या जीवनात अनेक चढ उतार येतात. अखेर चित्रपटाला एक शेवट मिळतो, पण तो शेवट काय आणि कसा हे थिएटरमध्ये जावूनच पाहावे लागेल.
दिग्दर्शन : चित्रपटाचे दिग्दर्शन फारच सुंदर झाले आहे. अत्यंत साधी कथा विस्तृतपणे मांडली आहे. सिनेमॅटोग्राफी, कॅमेरा वर्क आणि बैकग्राऊंड उत्कृष्ठ झाले आहे. सवांद अत्यंत प्रभावी आहेत. एखाद्या भागामध्ये किंवा कॉलनीमध्ये जीवन कसे असते, दैनंदिन घडामोडी कशा घडतात, हे अलंकृता यांनी अत्यंत उत्कृष्टपणे दर्शवले आहे. त्यामुळे दिग्दर्शन आणि कथेचा विचार करता चित्रपट अत्यंत चांगला आहे.
कलाकार : चित्रपटात प्रत्येक पात्राने अत्यंत चांगली भूमिका केली आहे. खासकरून रत्ना पाठक शाह यांनी खूप सुंदर काम केले आहे, त्यांचा अभिनय आपल्याला विचार करायलाही भाग पाडतो. कोंकणा सेन शर्मा, अहाना कुमरा आणि प्लाबितानेही चांगला अभिनय केला आहे. सुशांत सिंह आणि विक्रांत मासी यांचा अभिनयही उत्कृष्ट आहे. इतर कलाकारांनीही त्यांचे काम चोख केले आहे.
संगीत : चित्रपटाचे संगीत चांगले आहे.
पाहावा की नाही : एकदा तरी नक्की पहा! 

LEAVE A REPLY

*