MOVIE REVIEW: #FU : एफयू – फ्रेन्डशिप अनलिमिटेड

0

मल्टीस्टारर फ्रेन्डशिप अनलिमिटेड चित्रपटाचे कथानक आजवर येऊन गेलेल्या कॉलेज लव्हस्टोरीचपेक्षा वेगळे नाही. अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी मुलगा सत्याला लाँच करण्यासाठी तयार केलेल्या या भव्यदिव्य पटात सत्याखेरीज सर्वांनीच चूणुक दाखवली.

कौशल्य असलेल्या मेहनती कलाकारांनी मात्र मिळालेल्या संधीचे सोने केले.

कथा : साहिल, गौतम, मकरंद, चिली आणि बिल्ली या पाच मित्रांभोवती कथानक फिरते. वैदेहीला पाहून पहिल्या नजरेत प्रेमात पडलेला साहिल, मकरंदची प्रेमकहाणी अन् शिक्षिका असलेल्या शिना मॅडमच्या प्रेमात असलेला गौतम यातील गमतीजमती फुलतात. काही ठिकाणी रंजक वळण मिळते अन सर्व एकमेकापासून लांब होतात. पुढे ते भेटतात का, हे चित्रपटात पहा.

दिग्दर्शन : मांजरेकरांचे दिग्दर्शन चांगले झाले आहे. कथा दमदार नसल्याने त्यांना किमया साधता आली नाही. काही कलावंतांच्या निवडही चुकल्यासारख्या वाटतात. संदेश देण्याचे त्यांची शैली येथे जुळली नाही. नव्या फळीच्या कलावंतांना उत्तम व्यासपीठ दिले.

अभिनय : मयुरेश पेमने उत्तम भूमिका निभावली. तर पवनदीपने स्पार्क असल्याचे अभिनयातून दाखवले.

माधव देवचक्के आणि वैदेहीचाही अभिनय चांगला झाला आहे. चित्रपटाच्या आत्मा असलेल्या आकाशने नव्या रुपात प्रेक्षकांना आपलेसे केले असले तरी चित्रपटसृष्टीत टिकून राहण्यासाठी त्याने औरा आणखी मोठा करण्याची गरज आहे.

संगीत : सलमानने गायलेले ‘गच्ची’ गाणे दिलखुश करणारे आहे. १४ गाणी असलेला हा चित्रपट संगीताची जादू सोडणार नसला तरी नव्या प्रयोगाचे स्वागत नक्कीच होईल असा आहे.
आकाशला चित्रपटात मिळलेल्या संधीला त्याने न्याय देण्याचा जीवापाड प्रयत्न केला आहे, त्यामुळेच ग्रामीण बाज तसाच असला तरीही तो लक्ष वेधतेा. त्याला अभिनय, आवाजाचा टोन यावर विशेष काम आगामी काळात करायला हवे. मराठीतील नवा चेहरा म्हणून वैदेहीचा उल्लेख करावा वाटतो, कारण तिने यापुर्वीही तीन चित्रपट केले असते तरी यामध्ये तिने साधलेला नवेपणा मागची ओळख पूसुन नवी ओळख देणारा आहे. 

 

LEAVE A REPLY

*