MOVIE REVIEW : ‘हृदयांतर’

0
रेटिंग 4 स्टार

 

‘हृदयांतर’ सिनेमाव्दारे फॅशन डिझाइनर विक्रम फडणीस मराठी सिनेसृष्टीत निर्माता-दिग्दर्शक म्हणून आपलं पहिलं पाऊल टाकलय. सिनेमात सुबोध भावे वडिलांच्या तर मुक्ता बर्वे दोन मुलींच्या आईच्या भूमिकेत आहे.

  • कथा : शेखर जोशी (सुबोध भावे) ने हॉटेलिंगच्या क्षेत्रातील उच्च पदावरच्या नोकरीत उत्तम जम बसवलेला असतो. त्याची पत्नी समायरा (मुक्ता बर्वे) ही एका जाहिरात संस्थेमध्ये क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून काम करीत असते. दोघांच्याही लग्नाला १२ वर्षांहून अधिक काळ उलटून गेलेला आहे. या दोघांना नित्या व नैशा अश्या दोन मुली. नित्याला नृत्याची खूप आवड असते तर नायशाला स्पोर्ट्स खूप आवडते. शेखर हा त्याच्या कामात सतत बुडालेला असतो. त्याला आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ होत नाही. संसार व मुलांना सांभाळणे ही फक्त माझीच जबाबदारी नाही, वडील म्हणून तूही जबाबदारी उचलली पाहिजे असे समायरा त्याला सांगते. नेमके याच गोष्टीवरुन त्यांचे खटके उडत असतात. १२ वर्षांच्या संसारानंतर हे दोघं एकत्र राहण्याचं एकही कारण न सापडल्यामुळे वेगळं होण्याचा निर्णय घेतात. पण या चौकोनी कुटुंबात अशी काही एक घटना घडते की नात्यांची व्याख्याच बदलून जाते. कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे.. कोणती गोष्ट जास्त बहुमोल आहे याकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन शेखर आणि समायरा दोघांनाही मिळतो. त्यांचा हा दृष्टीकोन प्रेक्षकगृहात बसलेल्यांनाही खूप काही देऊन जाईल असाच आहे.
  • अभिनय : निष्ठा वैद्य (नायशा) हिने तृष्णिकाला (नित्या ) उत्तम साथ दिली आहे. खरेतर या चित्रपटाची खरी नायिका नित्याच आहे. नित्या व नायशा या दोन मुलींच्या आईवडिलांची भूमिका मुक्ता बर्वे व सुबोध भावे यांनी केली आहे. या सिनेमात भूमेकेच्या वेगवेगळ्या छटा मुक्ता बर्वे हिने अप्रतिम रेखाटल्या आहेत.  शेखर हा भावनाशून्य माणूस नाही पण कामामध्ये स्वत:ला पूर्ण बुडवून घेतल्याने तो आपल्या संसाराविषयी कोरडा बनला आहे. त्याचे हे वागणे सुबोध भावे याने अचूक रंगविले आहे. या चित्रपटात प्रख्यात नृत्यदिग्दर्शक शामक दावर, हृतिक रोशन, मनीष पॉल,अतुल परचुरे, मीना नाईक हे पाहुणे कलाकार म्हणून झळकले आहेत.
  • दिग्दर्शन : विक्रम फडणीस हे नाव मराठी सिनेसृष्टीसाठी नवीन असलं तरी ते बॉलिवूडमध्ये चांगलच परिचीत आहे. विक्रमचा हा दिग्दर्शित असा पहिला सिनेमा असला तरी सिनेमा पाहताना असे कुठेही वाटत नाही. कोणत्याही प्रकारचा भडकपणा सिनेमात दिसत नाही.  मराठी कुटुंबातील अनुबंध, तणाव या सगळ्या गोष्टींचे भान राखत विक्रमने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. त्याने या चित्रपटाची कथा १३ वर्षांपूर्वीच तयार केली होती. त्याचे आईवडील डॉक्टर असल्याने त्यांच्याकडून रक्ताच्या कर्करोगाविषयी सग‌ळी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यानंतरच तो चित्रपट बनविण्यासाठी मैदानात उतरला. 
  • संगीत : या चित्रपटात संगीतकार प्रफुल्ला कार्लेकर यांनी संगीत दिलेली गाणी श्रवणीय आहेत. या चित्रपटातील गाणी मंदार चोळेकर यांनी लिहिली असून त्यातील दोन गाण्यांच्या चाली उत्तम आहेत.
  • सिनेमाचा ट्रेलर :

 

LEAVE A REPLY

*