MOVIE REVIEW: बेवॉच

0
कथा.. 
ही कथा कॅलिफोर्नियाच्या समुद्र किनाऱ्यावरील लाइफ गार्ड्स म्हणजे बेवॉच टीमची आहे. त्यांचा प्रमुख असतो मिच (ड्वेन जॉन्सन). तो त्याच्या टीमबरोबर समुद्राच्या किनाऱ्यावरील सर्व घटनांवर लक्ष ठेवून असतो. काऊन्सिल मिचच्या टीममध्ये मॅट ब्राडी (जैक एफ्रॉन) ची नियुक्ती करते. त्याने मिच नाराज असतो. कारण मॅट कामात बेजबाबदार पणा करत असल्याचे त्याला आढळते. पण हळू हळू मॅट, मिच आणि टीमबरोबर मिक्स होतो. पण बीचवर जेव्हा ड्रग्जच्या बॅग आढळतात तेव्हा ट्विस्ट येतो. याचा संपूर्ण संशय बिझनेस वुमन विक्टोरिया लीड्स(प्रियंका चोप्रा) वर असतो. मिचची टीम कशाप्रकारे यापूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करते, हे पाहण्यासाठी सिनेमागृहात जावे लागेल.
दिग्दर्शन.. 
चित्रपटाचे दिग्दर्शन चांगले आणि समुद्राच्या किनाऱ्यावरील आणि अंडरवॉटर सीनचे शुटिंग उत्कृष्ट आहे. सिनेमॅटोग्राफी आणि कैमरावर्क चांगले आहे.
फाइट सिक्वन्सही चांगले शूट करण्यात आले आहे.
चित्रपटाची कमकुवत बाब त्याची कथा आहे. क्लायमॅक्सही फार चांगला नाही.
परफॉर्मंस…
चित्रपटाची स्टारकास्ट तगडी आहे. एकिकडे सुपर डुपर स्टार ड्वेन जॉनसन आहे तर तरुणांच्या हृदयावर राज्य करणारा जॅक एफ्रॉनही आहे. दोघांनीही चांगले काम केले आहे. दोघांमध्ये अनेक चांगले सीन आहेत. इतर सर्व कलाकारांनीही चांगले काम केले आहे. देसी गर्ल प्रियांका चोप्राचे सिक्वेन्सही चांगले आहेत. पण तिचा आणखी चांगला वापर करुन घेता आला असता.
संगीत.. 
बॅकग्राऊंड स्कोअर चांगला आहे..
पाहावा की नाही.. 
या सर्व अॅक्टर्सचे मोठे फॅन असाल तर हा चित्रपट नक्की पाहू शकता..

LEAVE A REPLY

*