MOVIE REVIEW :’काय रे रास्कला’

0
रेटिंग 1.5 स्टार

 

 

कथा : गौरव घाटणेकर मुख्य भूमिकेत असलेल्या ‘काय रे रास्कला’ चित्रपटामध्ये सामान्य ‘राजा’च्या टोप्या लावण्याच्या सवयीमुळे तो कशा प्रकारे एक प्लॅन आखतो आणि त्यात नव्या पात्रांचा प्रवेश कसा होत जातो म्हणजेच  ‘काय रे रास्कला’.

कथानकाच्या दृष्टीने हा ‘काय रे रास्कला’ सपशेल निराशाच करतो. कथानक कमजोर असलं तरीही कधीकधी कलाकारांचा अभिनय आणि छायांकन चित्रपटाच्या जमेच्या बाजू ठरतात. ‘काय रे रास्कला’ नाव असल्याने मराठी चित्रपटात दाक्षिणात्य फिल असलेली जी दृश्ये कोंबण्याचा अट्टहास केलेला आहे तो उबग आणणारा आहे.

अभिनय :  राजा या युवकाची भूमिका गौरव घाटणेकर याने केली आहे. त्याचा विनोदी स्वभाव हे त्याने आपल्या भूमिकेतून दाखविले आहे. वैजयंतीची भूमिका भाग्यश्री मोटे हिने ठीकठाक केली आहे. निखिल रत्नपारखी घरमालक शांताराम यांच्या भूमिकेत टा‌ळ्या मिळवतात. त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत सुप्रिया पाठारे यांनी अजिबात चांगली कामगिरी केलेली नाही. नागेश भोसले मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत दिग्दर्शकाने वाया घालविले आहेत.

दिग्दर्शन  :  या चित्रपटाचे दिग्दर्शक आय. गिरीधरन स्वामी यांनीच या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. दाक्षिणात्य बाज देण्याचा दिग्दर्शकाचा अट्टहास इथे काही कामास आला नाहीये. त्यांना हा विनोदी चित्रपट करायचा होता पण त्यांच्या हा प्रयत्न फसलेला दिसतो.

संगीत : काय रे रास्कला चित्रपटाला संगीत व पार्श्वसंगीत रोहन याने दिलेले आहे. चित्रपटातील गाणी प्रसंगाला अनुसरुन नाहीत, असंच वाटू लागतं. त्यातही ‘व्हेंटिलेटर’ला संगीत दिलेल्या रोहन-रोहन या संगीतकार जोडीने या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलंय.

LEAVE A REPLY

*