Thursday, May 2, 2024
Homeनंदुरबारप्रकाशा येथील आसाराम बापू आश्रमात मातृ पितृ दिवस

प्रकाशा येथील आसाराम बापू आश्रमात मातृ पितृ दिवस

चेतन इंगळे

मोदलपाडा ता.तळोदा

- Advertisement -

पाश्चात संस्कृतीचा युवा पिढीवर मोठा पगडा पडत असून, या पगड्यातूनच व्हॅलेंटाईन डे सारखा दिवस साजरा केला जात आहे. त्यामुळे भारतीय संस्कृतीचे मूल्य देखील पायदळी तुडवले जात आहे त्यामुळे या पाश्वभूमीवर प्रकाशा येथील आसाराम बापू आश्रमातर्फे व्हॅलेंटाईन डे वर बहिष्कार घालून त्या दिवशी मातृ पितृ दिवस साजरा करण्याबाबत शाळा कॉलेजांमध्ये जनजागृती केली जात आहे. या जनजागृतीस तरुणांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे संयोजकांनी सांगितले.

पाश्चिमात्य देशांमधील संस्कृतीचा पगडा देशातील युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरला आहे. त्यातूनच 14 फेब्रुवारीच्या व्हॅलेंटाईन डे युवक व युवती मोठया प्रमाणात साजरा करीत असतात. या फॅड मुळे भारतीय संस्कृतीच्या मूल्यांचा र्‍हास होत आहे. परिणामी संस्कृती चे ही संपूर्ण देशभरात नुकसान होत आहे. शिवाय संस्कार ही जोपासले जात नाही. या पाश्वभूमीवर प्रकाशा येथील संत आसाराम बापू आश्रमातील स्वयंसेवक गेल्या पंधरा वर्षांपासून समाज प्रबोधनाचे काम करीत आहे.यंदाही ते गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जिल्यातील विविध शाळा महाविद्यालयातील कॉलेज तरुण व तरुणींमध्ये जनजागृती करीत आहेत. ही जनजागृती करतांना व्हॅलेंटाईन डे सारखा तरुण पिढी बिगडवणार्‍या उपक्रमावर बहिष्कार घालून आपल्या संस्कृतीचे जतन करण्याचे आवाहन ते करीत आहे. एवढेच नव्हे तर या दिवशी आपल्या माता पित्यांचे पूजन करून त्यांना सात वेळा परिक्रमा घालण्याचे आवाहन ही युवकांना त्यांनी केले आहे. तसेच मातृ पितृ दिवस कसा साजरा करावा याचा प्रत्यक्ष डेमो ऋषिकेश ठाकरे व राजाराम किटाळे या स्वयंसेवकांनी करून दाखविला त्यामुळे त्यांच्या या उपक्रमास तरुण व तरुणी ही सहभागी होऊन चांगला प्रतिसाद देत असल्याचे या स्वयंसेवकांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी केला संकल्प

तळोदा तालुक्यातील दसवड येथील जिल्हा परिषद शाळेत जनजागृती करण्यात आली होती. तेव्हा तेथील लहान बालकांनी पाश्चिमात्य संस्कृती रुजवणारा व्हॅलेंटाईन डे वर बहिष्कार घालून त्या दिवशी मातृपितृ दिवस साजरा करण्याचा संकल्प केला आहे. त्या दिवशी हे सर्व विद्यार्थी आपापल्या घरी आपल्या आई वडिलांचे औक्षण करून पूजन करणार आहेत. दरम्यान यावेळी सरपंच कुंदन नाईक, मुख्याध्यापक दादा टुले, शिक्षक चेतन इंगळे उपस्थित होते.

लहान मुलांना लहानपणापासूनच संस्कार दिले गेले पाहिजे त्यामुळे आम्ही विशेषतः लहान बालकांमध्ये व्हॅलेंटाईन डे वर बहिष्कार टाकण्याबाबत प्रबोधन करीत करून त्या दिवशी मातृ पितृ दिवस साजरा करण्याचे आवाहन करीत आहे. गेल्या 15 वर्षांपासून खेड्या खेड्यात असा उपक्रम राबवित आहोत.केवळ लहान बालकांमध्ये चांगले संस्कार रुजवावे हा एकमेव उद्देश आहे.

राजाराम किटाळे स्वयंसेवक, प्रकाशा आश्रम

- Advertisment -

ताज्या बातम्या