Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मदर्स अ‍ॅण्ड बेबी वॉक; पाच ब्रँड अ‍ॅम्बेसेडर्सची निवड; महिला दिनानिमित्त 1 मार्चला वूमन्स वॉकेथॉन

Share

नाशिक । प्रतिनिधी

स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, यासाठी जनजागृती करण्याच्या संकल्पनेतून महिला दिनानिमित्त रविवारी(दि. 1) नाशिक ‘वूमन्स वॉकेथॉन’चे आयोजन करण्यात आले असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले. एमराल्ड पार्क येथे आयोजित पत्रकार परिषदेत वॉकेथॉनच्या आयोजिका सोनाली दाबक, वॉकेथॉनच्या ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर नलिनी कड, नयना पाटील हे होते.

यावेळी बोलताना सोनाली दाबक यांनी या उपक्रमाचे यंदा 4 थे वर्षे असल्याचे सांगून, सुयोजित व्हेरीडियन व्हॅली येथून तीन किलोमीटर अंतराचा हा उपक्रम होणार आहे. यंदा 10 फेब्रुवारीपासून त्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने नोंदणी सुरू झाली असल्याची माहिती संयोजिका सोनाली दाबक यांनी दिली.

दरवर्षीप्रमाणेच या वर्षीसुद्धा शिक्षण सामाजिक व्यावसायिक, खेळ आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या नाशिकमधील पाच महिलांना या उपक्रमाचे दूत म्हणून निवडण्यात आले आहे. नाशिकला महिलांमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केलेल्या या वॉकेथॉनमध्ये लहान बालिकेपासून अगदी 85 वर्षांच्या आजींपर्यंत सर्व वयोगटांतील महिला दरवर्षी सहभागी होतात.

‘मदर्स अ‍ॅण्ड बेबी वॉक’

या वर्षी नाशिकमध्ये प्रथमच या उपक्रमांअतर्गत ‘मदर्स अ‍ॅण्ड बेबी वॉक’ घेण्यात येणार आहे. 1.5 किमी अंतराच्या या वॉकमध्ये अगदी तान्ह्या बाळापासून ते 5 वर्षांच्या मुलांना घेऊन मातांसह गर्भवती स्त्रियांनाही सहभागी होता येईल. तसेच त्यांना विविध पारितोषिकांनी गौरविण्यात येईल. सामाजिक संदेश, वेशभूषा, सर्वोत्कृष्ट गट या निकषांवर वेगवेगळी परितोषिके दिली जातील.

पाच महिला ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर

या वर्षी ‘मी फिट फॅमिली फिट’ या थिमवर आयोजन केले जाणार आहे. या उपक्रमात गेले 3 वर्षे सलग सहभाग घेतलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यात प्रामुख्याने डॉ. मृदुला बेळे, नयना पाटील, नलिनी मधुकर कड, विनिता मोटवानी, गौरी चव्हाण यांचा समावेश आहे.

या अनोख्या उपक्रमात 2017 साली 1200 महिला सहभागी झालेल्या होत्या. 3 हजार महिलांनी सहभाग नोंदविला होता. ‘प्रथम येईल त्यास प्राधान्य’ या तत्वावर नोंदणी होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!