Type to search

maharashtra धुळे फिचर्स

वृद्ध आईला दोन दिवस घरात डांबले

Share

सेवानिवृत्त मुख्याध्यापक मुलगा व सुनेने फासला माणुसकीला काळिमा

धुळे  –

शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे मुलगा व सुनेने वृद्ध आईला दोन दिवस घरात डांबून ठेवले. सदर वृद्धेची पोलिसांनी घरातून सुटका केली. याप्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात मुलगा व सून यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ ही म्हण आता फक्त बोलण्यासाठीच आहे की काय? अशी शंका आता उपस्थित व्हायला लागली आहे.

दोंडाईचा (ता.शिंदखेडा) येथील भास्कर नगरातील प्लॉट नं.9 मध्ये मथुराबाई रामदास चौधरी (वय 72) या राहतात. त्यांना त्यांचा मुलगा नारायण रामदास चौधरी आणि सून शोभाबाई नारायण चौधरी यांनी घरात दोन दिवस डांबून ठेवले. घराला बाहेरुन कुलूप लावून हे दाम्पत्य बाहेर कुठेतरी गेले होते. दि.5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास दोंडाईचा येथील सैय्यद वाजीद अली यांनी दोंडाईचा पोलिसांना भास्कर नगरात एका महिलेला डांबून ठेवल्याची माहिती दिली. माहिती मिळताच दोंडाईचा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पंजाबराव राठोड हे फौजफाट्यासह घटनास्थळी पोहचले.

त्यांनी घराची पाहणी केली असता घराच्या दरवाजाला कुलूप लावल्याचे आढळून आले. घराच्या दुसर्‍या मजल्यावरील खोलीतील जिनाद्वारे जावून मथुराबाईची सुटका केली. पोलिसांनी दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात मथुराबाईंवर उपचार करण्यात आले.

मुलगा व सून यांनी घराला कुलूप लावून दोन दिवस घरात डांबून ठेवल्याचे सांगितले. मथुराबाईंच्या माहितीवरुन दोंडाईचा पोलीस ठाण्यात भा.दं.वि.कलम 342, 34 प्रमाणे नारायण चौधरी आणि शोभाबाई चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हे.काँ.व्ही.जी.जगदाळे हे करत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!