मदर तेरेसा यांच्या जीवनप्रवासाचा वेध घेणारा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

0
मुंबई : करुणा आणि शांतीच्या मार्गाचा अवलंब करत त्याच मार्गाने समाजाची मदत करणाऱ्या दिवंगत ज्येष्ठ समाजसेविका मदर तेरेसा यांच्या कार्याविषयी काहीच वेगळं सांगण्याची गरज नाही. आपलं संपूर्ण आयुष्यत गरजूंच्या मदतीसाठी वाहिलेल्या त्या एक देवदूत होत्या असं अनेकांचच म्हणणं आहे. अशा या समाजसेविका मदर तेरेसा यांचा जीवनप्रवास आता एका चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सोमवारीच त्याविषयीची घोषणा करण्यात आली. ‘मदर तेरेसा – द सेंट’ असं या चित्रपटाचं नाव असून, त्याचा फर्स्ट लूकही नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यात आला. ज्यामध्ये एका वयोवद्ध व्यक्तीचे जोडलेले हात दिलस असून, ते हात बरंच काही सांगून जात आहेत.

सीमा उपाध्यायने या चित्रपटाच्या पटकथा लेखनाची आणि दिग्दर्शनाची जबाबदारी घेतली असून त्यात भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट विश्वातील काही कलाकार झळकणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. प्रदीप शर्मा, नितीन मनमोहन, गिरीश जोहर आणि प्राची मनमोहन यांची या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी घेतली आहे.

मदर तेरेसा यांच्या बायोपिकबद्दल बोलताना सीमा उपाध्याय म्हणाल्या, अतिशय महत्त्वाच्या अशाय या प्रोजेक्टची सुरुवात कोलकात्यात चॅरिटी मिशनरीच्या सध्याच्या सर्वेसर्वा सिस्टर प्रेमा मेरी पेरिक आणि सिस्टर लिन यांची भेट घेऊन करण्यात आली. या सिनेमा संदर्भात आम्हाला बरीच उपयुक्त माहिती मिळाली. मिशनरीचे सर्वोच्च जनरल यांनी संपूर्ण टीमला खुप सा-या शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

*