Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

आईची मुलासह गळफास घेऊन आत्महत्या; पंचवटीतील घटनेने नाशिक हादरले

Share
पंचवटी | वार्ताहर
हनुमानवाडी परिसरातील मोरे मळा भागात माहेरी राहाणा-या एका ३२ वर्षीय विवाहितेने बुधवारी (दि.५) आपल्या अकरा वर्षाच्या मुलासह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, या आत्महत्या मागील कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमानवाडी परीसतील मोरे मळा येथे बुधवारी (दि.५) ही घटना घडली. सुमन विजय चव्हाण (वय ३२) व मुलगा आदेश विजय चव्हाण (वय ११) असे आत्महत्या केलेल्या आई व मुलाचे नाव आहे.
सुमन चव्हाण व पती यांचे कौटुंबिक वाद विवाद होत असल्याने त्या माहेरी आईकडे रहात होत्या. बुधवारी रोजी दुपारच्या सुमारास सुमन यांच्या आई कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या.
यावेळी सुमन यांचा मुलगा आदेश याच्यासह घरात एकटेच होते. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सुमन यांच्या आई आल्या. त्यांनी दरवाजा ठोठावला मात्र आतुन कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी शेजारच्यांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडला.
यावेळी सुमन चव्हाण यांनी घरातील पंख्याला साडीच्या सहाय्याने आपल्या मुलासह गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना उघडकीस आली.
या घटनेची तात्काळ पंचवटी पोलिसांत माहीती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, या आत्महत्येचे कारण समजु शकले नाही. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!