हरसुलमध्ये आईसह मुलगा व मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले; घातपाताचा संशय

0
नाशिक | त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथे आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास आईसह मुलगा व मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा जमिनीच्या हव्यासापोटी करण्यात आलेला घातपात असल्याचा आरोप महिलेच्या वडिलांनी केला आहे.

आई हौसाबाई गिरीधर लोखंडे (वय ३६), मुलगा नीरज गिरीधर लोखंडे (वय १२), मुलगी माधुरी गिरीधर लोखंडे (वय १०) अशी आत्महत्या केलेल्या आई आणि मुलांची नावे आहेत. दरम्यान, ही घटना आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास उघडकीस आली. महिलेच्या पतीने चार महिन्यापूर्वीच याच ठिकाणी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. यामुळे अधिक हळहळ व्यक्त होतआहे.

जयराम बाळू धनवले (हौसाबाई लोखंडे यांचे वडील) (रा. चिखलपाडा ता. त्र्यंबकेश्वर) यांनी सांगितले आहे की, त्यांच्या जमिनीच्या हव्यासापोटी मुलीच्या चुलत सासऱ्यांनी व दिरांनी घातपात केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच गळफास घेतलेल्या व्यक्तींची अवस्था संपूर्णपणे संशयास्पद असल्याने हा घातपातच असल्याचे जयराम धनवले म्हणाले.

तिघांचे शव विच्छेद्नासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर या घटनेतील सत्य बाहेर येणार आहे. त्यानुसार पोलीस पुढील कारवाई करणार आहेत. दरम्यान, हरसूल पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

LEAVE A REPLY

*