Friday, April 26, 2024
HomeनाशिकVideo : सप्तशृंगी गडावर फुटला मायेचा पाझर; माकडीन सांभाळतेय पंधरा दिवसांपासून मृत...

Video : सप्तशृंगी गडावर फुटला मायेचा पाझर; माकडीन सांभाळतेय पंधरा दिवसांपासून मृत पिलाला

फोटो / व्हिडीओ : इम्रान शाह

दिंडोरी । नितीन गांंगुर्डे

- Advertisement -

आई म्हणजे ममता, आई म्हणजे आत्मा. आत्मा आणि ईश्वर या दोघांचा संगम म्हणजे आई’ असे म्हटले जाते. जगात सर्व श्रेष्ठ प्रेम खरे आईचे असते. ती आई मनुष्य जातीतील असो किंवा प्राणी जातीतील.

याचा प्रत्यय युगानुयुगे सर्वांनी घेतलेला आहे. अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना सप्तशृंगगडावर घडली आहे. गेल्या १५ दिवसांपासून माकडीन (मादी माकड) आपल्या दगावलेल्या पिल्लाला घेऊन फिरत असून तिचा पुत्रमोह अजूनही सुटलेला नाही.

गडावरील मातृप्रेमाची कहानी आपण जर डोळ्यांनी पाहिली तर आपल्याही डोळ्यांना पाझर फुटल्याशिवाय राहणार नाहीत आणि दगडाचेही ह्दय हेलावेल अशीच काही परिस्थिती येथे आहे.

सप्तशृंगी गडावर फुटला मायेचा पाझर; माकडीन सांभाळतेय पंधरा दिवसांपासून मृत पिलाला

गडावरील एका माकडीन च्या पिलाचा 15 दिवसांपुर्वी मृत्यू झाला होता. ही मादी माकड त्या पिलाला खुप जीव लावायची. तिला या पिलाचा विरह सहन झाला नाही.

ती इतर माकडापासून काही दिवस या पिलाला घेऊन वेगळी फिरत राहिली. या पिलाचा मृत्यू झाला आहे हे ती मानतच नाहीये. ती त्या पिलाला छातीशी कवटाळते.

त्याच्या मृतदेहाला खाऊ घालण्याचा प्रयंत्न करते. त्याचप्रमाणे त्याला पाणी पाजते. त्याच्याशी खेळते. त्याला अंगावर घेऊन झोपते व इकडे तिकडे उडयाही मारते.

त्या पिलाचे निर्जीव शरीर आहे, त्या मृतदेहाची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. ते मृत शरीर काळेठिक्कर पडले आहे व त्याचा दुर्गंधदेखील येऊ लागला आहे. तरीही माकडीन ते प्रेत सोडायला तयार नाही. गडावरील ग्रामस्थांचे मुक्या प्राण्याच्या मातृत्वाची ही घटना पाहून हेलावले आहेत.

मायेची ममता काय असते…तिचं जीव लावणं काय असते हे या घटनेतून समजते अशा काही प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या