Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

जऊळके येथे मायलेकींची आत्महत्या

Share

विखरणी | राजेंद्र शेलार

येवला तालुक्यातील जऊळके येथील मायलेकींचा मृतदेह विहिरीत आढळून आल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. कांचन गणपत जाधव (वय ३५) व धनश्री गणपत जाधव (वय १२) असे या मायलेकींचे नावे आहेत. या घटनेमुळे जऊळके व परिसरात शोककळा पसरली आहे.

गणपत जाधव हे आपल्या कुटुंबासह जऊळके शिवारात शेतातच वस्ती करून राहतात. मंगळवारी रात्री गणपत जाधव हे जवळच असलेल्या सातारे येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले होते. कार्यक्रम आटोपून रात्री उशिरा आले असता दरवाजा वाजवून पाहिला मात्र दरवाजा न उघडल्याने पत्नी व मुलगी झोपले असतील असे समजून तेही घराच्या बाहेर असलेल्या खाटेवर झोपी गेले.

सकाळी उठल्यानंतर घरात झोपलेली पत्नी व मुलगी दिसत नसल्याने शेजारी चौकशी करत असताना कुत्र्याचे पिल्लू घराजवळ असलेल्या विहीरीकडे चकरा मारताना दिसले. विहिरीत पिण्यासाठी १५ ते २० फुट पाणी साठवून ठेवले होते.

विहिरीजवळ गेल्यावर तेथे बँटरी पडलेली दिसल्याने त्यांचा संशय अधिक बळावला. विहिरीतील पाण्याचा उपसा केल्यावर मायलेकीचा मृतदेह विहिरीत आढळला.

सदर घटनेची माहिती समजल्यावर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती. दोन्ही माय लेकींना विहीरीतून काढण्यात येऊन मृतदेह ग्रामीण रुग्णालय येवला येथे पोस्टमार्टेम साठी पाठवण्यात आले.

तत्पूर्वी येवला तालुका पोलीस स्टेशनला घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विलास ताटीकोंडलवार यांनी घटनास्थळी धाव घेवून माहिती घेतली.

येवला पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली. संध्याकाळच्या सुमारास शोकाकुल वातावरणात मायलेकीवर जऊळके येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!