उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पर्यटनाला जाताय; मग हे अॅप आपल्यासाठीच…

0
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये अनेकजण कुटुंबासोबत सहलीसाठी जाण्याचा प्लान करत असतात. अनेकदा रस्ते चुकणे, हॉटेलचा पत्ता मिळत नाही. एखाद्या विशिष्ट ठिकाणाची माहिती हवी असल्यास मोबाईल अॅप उपलब्ध असून याठिकाणची इत्यंभूत माहिती दिली जात आहे. 

पर्यटनासाठी जाताना या मोबाईल अपची माहिती आपल्याला असायलाच हवी

गुगल मॅप :

या अॅपद्वारे आपल्याला ज्या ठिकाणी जायचे आहे त्या ठिकाणी किती मार्ग आहेत तसंच कोणत्या मार्गाने गेल्यावर किती अंतर पडेल याची सविस्तर महिती आपल्याला मिळते. तसंच जिथून आपल्याला जायचं आहे तिथपासून संभव्य  स्थानापर्यंतचं अंतर व जाण्यासाठी कोणत्या वाहनाने गेल्यास किती वेळ लागतो, याची माहिती आपल्याला मिळते. यापुढे प्रवासाला जाण्याचा बेत आखण्याकरिता हे उपयोगी अॅप आहे.

हॉलिडे आयक्यू  :

भारतातील विविध पर्यटनस्थळे हॉस्टेल्स, रिसॉर्टस तसेच आपल्या घराप्रमाणे घरगुती राहण्याची व्यवस्था इ. गोष्टींच्या  माहिती करीता  हॉलिडे आयक्यू हे अत्यंत उपयोगी  अॅप आहे. या अॅपमध्ये आपल्याला देशातील दोन हजाराहून अधिक हॉटेल्सची माहिती दिलेली आहे . यामध्ये हॉटेल्सचे दर तसेच आधी राहून आलेल्या व्यक्तिंनी त्या हॉटेल्सला दिलेला दर्जा इथे पाहता येते . या अॅपद्वारे आपण आपल्या स्थानिक ट्रॅव्हल एजंटशी किंवा हॉटेल्सशी संपर्क साधू शकतो.

ट्रिपिगेटर :

भारत  सरकारने पर्यटनाला चालना देण्यासाठी इन्क्रेडिबल इंडिया ही मोहीम हाती घेतली होती. यामध्ये पर्यटन मंत्रालयातर्फे विविध पर्यटन केंद्राच्या विकासापासून ते तेथे सहलीचे आयोजन करण्यापर्यत विविध उपक्रम हाती घेतले. या सर्वांची माहिती संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. पर्यटकांकरिता  केंद्र सरकारने पर्यटन विभागामार्फत नुकतेच एक मोबाइल अॅप लाँच केले आहे. यात  देशातील विविध शहरांची माहिती देण्यात आली असून यामध्ये आपण आपल्याला आवडते ठिकाण आणि तेथे जाण्याचा कालावधी निवडल्यानंतर त्या कालावधीत तेथे असणाऱ्या हवामाबद्दलनही या अॅपद्वारे माहिती मिळते. कायम प्रवास करण्याची आवड असणाऱ्यांसाठी हे एक उत्तम अॅप आहे.

दुर्ग संपत्ती (Durg Sanpatti) :

गड-किल्ल्यांना भेट देणाऱ्यांकरिता  हे अॅप उपयोगी ठरेल. महाराष्ट्रातल्या विविध गड-किल्ल्यांची माहिती, इतिहास, नकाशा, दिशा, समुद्र सपाटीपासून त्याची असलेली उंची अशी सगळी माहिती अॅपवर उपलब्ध आहे. जलदुर्ग, नलदुर्गासारखे वनदुर्ग, गिरीदुर्ग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या किल्ल्यांची माहिती या अॅपवर   मिळवता येईल.

झॉपहॉप (Zophop) :

रोज किंवा दुसऱ्या राज्यात गेल्यावर बसनं प्रवास करायचा असेल तर हे अॅप अत्यंत उपयोगी आहे . मुंबई, दिल्ली, बंगलोर, इंदूर, जयपूर, छत्तीसगड, भोपाळ, पुणे या आणि अशा १५ वेगवेगळ्या ठिकाणचे बसस्टॉप, ठिकाणांवर पोहोचायचा सुलभ मार्ग, बसची वेळ, भाडं, अशा अनेक गोष्टींच्या माहितीमुळे हे अॅप,उपयोगी ठरतं.

इंडियन नॅशनल पार्क (Indian National Park) :

अनेकदा कुठलं अभयारण्य कुठल्या वन्यजीवांसाठी प्रसिद्ध हे जाणून घेण्याकरिता हे अॅप उपयोगी आहे . या अॅपद्वारे वेगवेगळ्या ठिकाणच्या अभयारण्यांची माहिती, खासियत, सगळ्या जास्त दिसणारा प्राणी, भेट देण्याचा योग्य काळ अशा विविध गोष्टी माहिती मिळते.

युरोप ट्रॅव्हल गाईड ऑफलाइन (Europe Travel Guide offline) :

युरोप ट्रॅव्हल गाइड हे अॅप परदेशात फिरणाऱ्यांकरिता उपयोगी  आहे. हे ऑफलाइनसुद्धा वापरता येत असल्यानं उपयोगी ठरतं. युरोपमधली प्रेक्षणीय ठिकाणं, खासियत, विविध शहरं या आणि अशा अनेक गोष्टींची माहिती अॅपमध्येच असल्यामुळे ऑफलाइन वापरणं शक्य होतं. पन्नासच्यावर  वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती या अॅपमध्ये आहे.

गूगलचे पर्यटन अ‍ॅप (‘ट्रिप्स’) :

पर्यटनाची ठिकाणे सुचवणारी, माहिती देणारी आणि अगदी प्लॅनिंगची सुविधादेखील पुरवणारी गूगलने  ‘ट्रिप्स’ अ‍ॅप्सची अ‍ॅपची घोषणा केली आहे. हे अ‍ॅप आॅफलाइन पद्धतीने काम करत असल्याने इंटरनेट नसतानादेखील याचा वापर करता येणार आहे हे विशेष.

या ‘ट्रिप्स’मध्ये नकाशे, पर्यटनस्थळांचे फोटो, आॅनलाइन तिकिटे तसेच हॉटेल बुक करणे अशा सोयी असणार आहेत. यात एक विशेष फीचरदेखील उपलब्ध असणार आहे. ते म्हणजे युजरच्या गूगल सर्च हिस्ट्रीवरून त्या युजरची आवडनिवड जाणून घेत त्या संदर्भातली माहितीदेखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. हे अ‍ॅप मोफत उपलब्ध असणार असून , ते सर्व प्रकारच्या स्मार्टफोन्सवर उत्तम प्रकारे काम करणार आहे.

लेखक : प्रा योगेश अशोक हांडगे  (लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)

LEAVE A REPLY

*